TRENDING:

मुलाचा मृत्यू, पहिल्या पत्नीपासून घेतला घटस्फोट, मग 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरसोबत थाटला संसार

Last Updated:
Birthday Special: गेल्या 38 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेत्याने तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांत खलनायक, नायक आणि सहाय्यक भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
1/7
मुलाचा मृत्यू, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट,12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी लग्न
बॉलिवूड आणि साऊथ दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारा 'व्हिलन' म्हणजेच अभिनेते प्रकाश राज. . दमदार अभिनय, प्रभावी संवादफेक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. बर्थ डे स्पेशल त्यांच्या लाइफविषयी काही गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/7
गेल्या 38 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांत खलनायक, नायक आणि सहाय्यक भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. बंगळुरू येथे जन्मलेल्या प्रकाश राज यांचे वडील हिंदू तर आई ख्रिश्चन होत्या. त्यांनी सेंट जोसेफ इंडियन हायस्कूल आणि सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शिक्षण घेतले.
advertisement
3/7
सुरुवातीला ते पथनाट्यांमध्ये काम करून महिन्याला 300 रुपये कमवत असत. त्यानंतर त्यांनी कन्नड मालिकांमध्ये भूमिका केल्या आणि हळूहळू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रकाश राज यांनी 2009 मध्ये 'वॉन्टेड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी 'सिंघम', 'दबंग 2', 'हिरोपंती', 'जंजीर' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले. बहुतेक चित्रपटांत त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली.
advertisement
4/7
प्रकाश राज यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. 1994 मध्ये त्यांनी अभिनेत्री ललिता कुमारी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मात्र 2004 मध्ये त्यांचा 5 वर्षांचा मुलगा सिद्धू एका अपघातात गमावला. या धक्क्याने त्यांचे कुटुंब तुटले आणि 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
5/7
घटस्फोटानंतर प्रकाश राज यांनी पुढच्याच वर्षांनी 12 वर्षांनी लहान असलेल्या कोरिओग्राफरशी लग्न केले. 24 ऑगस्ट 2010 रोजी प्रकाश यांनी कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केले. लग्नाच्या 5 वर्षांनंतर, पोनीने वेदांत नावाच्या मुलाला जन्म दिला.
advertisement
6/7
प्रकाश राज यांच्याकडे कोणताही मॅनेजर नाही. ते स्वतःच चित्रपट निवड, करार आणि फी ठरवतात. एवढंच नाही, तर ते आपल्या कमाईतील २०% हिस्सा धर्मादाय संस्थांना दान करतात. त्यांची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये असून, ते एका चित्रपटासाठी 2.5 कोटी रुपये घेतात. त्यांच्याकडे मुंबई, चेन्नईमध्ये आलिशान घरे आणि एक फार्महाऊस आहे.
advertisement
7/7
प्रकाश राज यांनी महबूबनगर (तेलंगणा) येथील कोंडारेडिपल्ले गाव दत्तक घेतले आणि तिथे विकासकामे सुरू केली. त्यांची ड्युएट मुव्हीज नावाची निर्मिती कंपनीही आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मुलाचा मृत्यू, पहिल्या पत्नीपासून घेतला घटस्फोट, मग 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरसोबत थाटला संसार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल