मोनालिसाशी लग्नाला तयार नव्हता फरमान खान, कसा झुकला अभिनेता? सांगितली लग्नाची INSIDE STORY
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Monalisa Bhosle Marriage: फरहानने सांगितल्यानुसार, मोनालिसाने दिलेल्या धमकीमुळे त्यांनी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/9

२०२५ च्या कुंभमेळ्यात माळा विकता-विकता रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली मोनालिसा भोसले सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसाचा कुंभमेळ्यातील व्हिडीओ व्हायरल होताच संपूर्ण देशाचं लक्ष तिने वेधून घेतलं.
advertisement
2/9
मात्र, मोनालिसा भोसलेने मल्याळम अभिनेता फरमान खानशी लग्न करून सर्वांनाच धक्का दिला. केरळच्या एका मंदिरात थाटामाटात त्यांनी लग्न केलं. पण आता त्यांच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला जात आहे.
advertisement
3/9
याच आरोपांवर सडेतोड उत्तर देण्यासाठी या जोडप्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांनी सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली आहेत. दरम्यान, यावेळी फरमानने असा खुलासा केला आहे, जो ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. फरहानने सांगितल्यानुसार, मोनालिसाने दिलेल्या धमकीमुळे त्यांनी तातडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/9
फरमान आणि मोनालिसाच्या लग्नाची कथा एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. फरमानने सांगितल्यानुसार मोनालिसाने त्याला लग्नाची मागणी घातली होती. परंतु त्याने तिचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. मात्र मोनालिसाच्या जिद्दीपुढे त्याने माघार घेतली.
advertisement
5/9
मोनालिसानेही पत्रकार परिषदेतही सांगितलं की घरी तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. तिच्या आत्याच्या मुलाशी तिचं लग्न लावण्यासाठी पाहुणेही घरी आले होते.
advertisement
6/9
मोनालिसाने फरमानला जवळजवळ धमकी देत सांगितलं, "माझं घरचे जबरदस्ती लग्न लावून देतायत, जर तू मला वाचवलं नाहीस, तर मी २-३ दिवसांत जीव देईन." एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, याच भावनेतून फरमानने तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.
advertisement
7/9
दरम्यान लव्ह जिहादच्या आरोपांवर सडेतोड उत्तर देत फरमान म्हणाला, "माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. जर मला काही चुकीचं करायचं असतं, तर मी हिंदू पद्धतीने मंदिरात लग्न का केलं असतं? मोनालिसा तिचा हिंदू धर्मच पाळणार आहे आणि मी माझा मुसलमान धर्म." मोनालिसानेही याला दुजोरा दिला असून, तिने आपला धर्म बदललेला नसल्याचे स्पष्ट केले.
advertisement
8/9
या लग्नाचं वैशिष्ट्य म्हणजे, एका छोट्या मंदिरात झालेल्या या सोहळ्याला केरळचे दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते. शिक्षण मंत्र्यांपासून ते खासदारांपर्यंत सर्वांनी या आंतरधर्मीय विवाहाला पाठिंबा दिला.
advertisement
9/9
"कुटुंबाची नाराजी १०-१५ दिवसांत दूर होईल, पण ज्या नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आम्ही ऋणी आहोत," अशा भावना या जोडप्याने व्यक्त केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मोनालिसाशी लग्नाला तयार नव्हता फरमान खान, कसा झुकला अभिनेता? सांगितली लग्नाची INSIDE STORY