माजी खासदाराची मुलगी; आज सिनेविश्वात सर्वात जास्त डिमांड; आलिया, दिपिका किंवा नयन ताराही तोडू शकल्या नाहीत तिचा रेकॉर्ड
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने करिअरच्या सुरुवातीला सलग अपयश पाहिलं, पण जेव्हा कमबॅक केलं तेव्हा थेट 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली.
advertisement
1/6

'यशस्वी होण्यासाठी फक्त टॅलेंट नाही, तर संयमही लागतो', असं मनोरंजन विश्वात नेहमी म्हटलं जातं. ग्लॅमरच्या या जगात उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. जर एखाद्या अभिनेत्रीचे सुरुवातीचे दोन-तीन चित्रपट फ्लॉप झाले, तर तिला 'अनलकी' ठरवून इंडस्ट्रीतून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अनेकदा तर नशिबाची साथ मिळेपर्यंत चांगल्या संधीही हातातून निसटतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने करिअरच्या सुरुवातीला सलग अपयश पाहिलं, पण जेव्हा कमबॅक केलं तेव्हा थेट 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली.
advertisement
2/6
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रेक्षकांची लाडकी 'राजमाता शिवगामी' म्हणजेच रम्या कृष्णन आहे. आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोण यांच्याही आधी असा विक्रम करणाऱ्या रम्या कृष्णन यांचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर आणि वेगळा आहे.
advertisement
3/6
वारसा अभिनयाचा, पण नशिबाची साथ मिळेनासप्टेंबर 1970 मध्ये चेन्नईत जन्मलेल्या रम्या यांना अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. त्यांचे आजोबा प्रसिद्ध तमिळ अभिनेते आणि खासदार रामास्वामी होते. मात्र, घरात फिल्मी वातावरण असूनही रम्या यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी मल्याळम चित्रपट 'नीरम पुलारुम्बाल'मधून करिअरला सुरुवात केली, पण तो रिलीज व्हायला उशीर झाला. त्यानंतर आलेले तमिळ आणि तेलगू चित्रपट एकामागून एक फ्लॉप झाले.
advertisement
4/6
नशिबाने घेतलेली ती 'टर्निंग' करवटअखेर 989 मध्ये दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या 'सूत्रधारुलु' चित्रपटाने रम्या यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. या चित्रपटामुळे त्यांची 'फ्लॉप हिरोईन' ही प्रतिमा पुसली गेली आणि त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
advertisement
5/6
'बाहुबली' आणि करिअरची दुसरी इनिंगखऱ्या अर्थाने रम्या कृष्णन यांचे नाव जगभर पोहोचले ते एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटामुळे. 1800 कोटींची कमाई करणाऱ्या या महासिनेमात त्यांनी साकारलेली 'शिवगामी देवी' आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. त्यांचा "मेरा वचन ही है मेरा शासन" हा संवाद आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटानंतर त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.
advertisement
6/6
आजची संपत्ती आणि मानधनकधीकाळी अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या रम्या कृष्णन आज एका चित्रपटासाठी साधारण 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेतात. रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 98 कोटींच्या घरात आहे. रजनीकांत यांच्या 'जेलर' सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माजी खासदाराची मुलगी; आज सिनेविश्वात सर्वात जास्त डिमांड; आलिया, दिपिका किंवा नयन ताराही तोडू शकल्या नाहीत तिचा रेकॉर्ड