TRENDING:

Gaurav More : गौरव मोरेचा अ‍ॅड्रेस बदलला, पवईच्या फिल्टरपाड्यातून थेट टॉवरमध्ये

Last Updated:
Gaurav More : अभिनेता गौरव मोरेच्या घराचा पत्ता बदलला आहे. गौरव मोरे फिल्टरपाड्याच्या चाळीतून थेट आलिशान घरात शिफ्ट झालाय.
advertisement
1/7
गौरव मोरेचा अ‍ॅड्रेस बदलला, पवईच्या फिल्टरपाड्यातून थेट टॉवरमध्ये
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' या शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा मराठमोळा अभिनेता गौरव मोरेचा पत्ता बदलणार आहे.
advertisement
2/7
पवईच्या फिल्टरपाड्यात राहणारा गौरव मोरे चाळीतून थेट आलिशान टॉवरमध्ये गेला आहे. गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
advertisement
3/7
एक वर्षांआधी म्हाडाच्या लॉटरीत गौरव मोरेला पवई येथे घर लागलं होतं. त्या घराची चावी त्याला आज त्याला मिळाली.
advertisement
4/7
गौरव मोरेचं फिल्टरपाड्याच्या चाळीतून आलिशान टॉवरमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण झालं आहे.
advertisement
5/7
म्हाडाच्या मुंबई मंडळाने मागील वर्षी 2,030 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यात गौरवने कलाकार कोट्यातून पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज भरला होता. या सोडतीत तो विजेता ठरला होता.
advertisement
6/7
बिल्डिंग निर्माणधीन असल्याने गौरवला एक वर्ष प्रतिक्षा करावी लागली पण आता ओसी मिळताच वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर गौरवला अखेर म्हाडाच्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत.
advertisement
7/7
गौरव मोरेसह 'माझा होशील ना' फैम अभिनेत्री गौतमी देशपांडे हिलादेखील गोरेगावमधील घराच्या चाव्या देण्यात आल्या. गौतमीला देखील मागील वर्ष म्हाडाचं घर लागलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gaurav More : गौरव मोरेचा अ‍ॅड्रेस बदलला, पवईच्या फिल्टरपाड्यातून थेट टॉवरमध्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल