Girija Oak Mother : वडिलांबद्दल सगळ्यांनाच माहिती, पण कोण आहे गिरिजा ओकची आई, करते काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Girija Oak Mother : अभिनेत्री गिरिजा ओकच्या आयुष्यात तिच्या आईचा खूप मोठा रोल आहे. आईच्या दुसऱ्या लग्नात गिरिजानं साक्षीदार म्हणून सही केली होती. कोण आहे गिरिजा ओकची आई? ती करते काय?
advertisement
1/9

नॅशनल क्रश झालेली मराठी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक. गेली अनेक महिने सोशल मीडियावर गिरिजा ओकची चर्चा आहे. तिच्या साधेपणाच्या जग प्रेमात पडलंय. तिच्या कामाचंही सर्वत्र कौतुक होतंय.
advertisement
2/9
तर दुसरीकडे पडद्यामागची गिरिजा ओक देखील प्रेक्षकांसमोर आली. गेली अनेक वर्ष नाटक, सिनेमा, जाहिरांतीमध्ये काम करणारी गिरिजा ओक खऱ्या आयुष्यात कशी आहे याचे अनेक पैलू अनेक मुलाखंतीमध्ये पाहायला मिळाले.
advertisement
3/9
अभिनयाचं बाळकडू गिरिजाला घरातूनच मिळाले. ज्येष्ठ प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरिश ओक यांची ती मुलगी. असं असलं तरी गिरिजानं इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
4/9
गिरिजाच्या वडिलांबद्दल म्हणजेच अभिनेते गिरिश ओक यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. गिरिजाच्या अभिनयात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर गिरिजाच्या करिअरमध्ये आणि तिच्या आयुष्यात तिच्या आईचा देखील खूप मोठा रोल आहे. कोण आहे गिरिजा ओकची आई? करते काय?
advertisement
5/9
नॅशनल क्रश झाल्यानंतर किंबहुना त्याआधीही गिरिजानं अनेक मुलाखती दिल्या आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत गिरिजा तिच्या आईसह सहभागी झाली होती. या मुलाखतीत गिरिजाची आई काय करते हे पहिल्यांदा समोर आलं.
advertisement
6/9
पद्मश्री फाटक असं गिरिजा ओकच्या आईचं नाव आहे. गिरिजा ही गिरिष ओक आणि पद्मश्री ओक यांची मुलगी आहे. गिरिष ओक यांच्याबरोबर डिवोर्स झाल्यानंतर पद्मश्री यांनी संजय फाटक यांच्याशी दुसरं लग्न केलं.
advertisement
7/9
दिल के करीबमध्ये बोलताना गिरिजानं सांगितल्याप्रमाणे, पद्मश्री फाटक या गेली अनेक वर्ष राष्ट्र सेविका महिला समिती संघटनेत काम करत आहेत. त्या अनेक वर्ष नोकरी करत होत्या. त्या संस्कारवर्गही घ्यायच्या.
advertisement
8/9
गिरिजाची आईनं सांगितलं, "राष्ट्र सेविका महिला समिती संघटनेला 2026मध्ये 90 वर्ष पूर्ण होतील. या संस्थेतसाठी मी लहानपणापासून काम करतेय. आम्ही भारतभर शिबीर घेतो. मातृशक्तीचं जागर करतो. मानसिक, बौद्धिक, शारीरिकरित्या महिला सक्षम व्हाव्या यासाठी काम करतो."
advertisement
9/9
संस्कारक्षम पिढी घडवणं, त्यांना देशभक्ती शिकवणं अशा पद्धतीचं काम त्या करतात. कोकणप्रांत म्हणजे गोव्यापासून डहाणूपर्यंतची किनारपट्टी त्याच्या त्या प्रमुख आहेत. गिरिजा ओकची आई त्यांच्या या कामाला ईश्वरी कार्य म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak Mother : वडिलांबद्दल सगळ्यांनाच माहिती, पण कोण आहे गिरिजा ओकची आई, करते काय?