Girija Oak : तो क्षण जादुई! 2 दिवस उदयपूरमध्ये होती गिरिजा ओक, तिथे असं घडलं? सगळं वाटू लागलं मॅजिकल, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Girija Oak : अभिनेत्री गिरिजा ओक उदयपूरला गेली होती. तिथे असं काय घडलं ज्यामुळे तिला सगळं मॅजिकल वाटू लागलं.
advertisement
1/8

मनोरंजन विश्वातील 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या गिरिजाची प्रत्येक पोस्ट व्हायरल होत असते.
advertisement
2/8
यावेळीही तिने शेअर केलेल्या एका खास पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'तो क्षण जादुई असतो' असं म्हणत गिरिजानं पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
3/8
गिरिजा दोन दिवस उदयपूरमध्ये होती. तिथे तिनं असं काय अनुभवलं ज्यामुळे तिला तो क्षण खास वाटला? गिरिजा ओक नेमकी उदयपूरला का गेली होती? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
advertisement
4/8
याचं उत्तर गिरिजाच्या पोस्टमधून मिळालं आहे. गिरिजा तिच्या जिवलग मैत्रिणीच्या लग्नासाठी उदयपूरला गेली होती. या लग्नसोहळ्यासाठी ती तब्बल दोन दिवस उदयपूरमध्ये होती.
advertisement
5/8
हे दोन दिवस तिच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरले. लग्नाचा आनंद, मित्रमैत्रिणींसोबतची मस्ती आणि सेलिब्रेशन तिनं केलं.
advertisement
6/8
गिरिजासाठी जादुई क्षण कोणता होता हे तिनं पोस्टमध्ये सांगितलं. तिनं पोस्टमध्ये लिहिलंय, "दोन जिवलग माणसं आयुष्यभरासाठी एकमेकांची होतात, तो क्षण खरंच जादुई असतो."
advertisement
7/8
"उदयपूरमध्ये लग्न सेलिब्रेट करताना दोन दिवस इतके मजेशीर, वेडे, सुंदर आणि मनाला भिडणारे गेले की काय सांगू! माझ्या फेव्हरेट गर्ल्ससोबत धमाल केली."
advertisement
8/8
"नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या, भरपूर डान्स केला, Mario बनून धमाल केली आणि खूपच टेस्टी जेवणाचा आस्वाद घेतला. एकंदरीत भन्नाट अनुभव!आणि या सुंदर साडीसाठी खास आभार"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak : तो क्षण जादुई! 2 दिवस उदयपूरमध्ये होती गिरिजा ओक, तिथे असं घडलं? सगळं वाटू लागलं मॅजिकल, PHOTO