TRENDING:

अवघ्या 72 तासांत 1300 कोटींची कमाई! 'ही' नवी फिल्म 'धुरंधर'साठी ठरली डोकेदुखी, बॉक्स ऑफिसवर केला कब्जा

Last Updated:
Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसवर धुरंधरने बक्कळ कमाई केली असली, तरीही नुकतंच रिलीज झालेल्या फिल्मने 'धुरंधर'ला मोठा झटका दिला आहे.
advertisement
1/8
अवघ्या 72  तासांत 1300 कोटींची कमाई! 'ही' नवी फिल्म 'धुरंधर'साठी ठरली डोकेदुखी
भारतात सध्या 'धुरंधर २' चं वादळ आलं आहे. रणवीर सिंग आणि आदित्य धर या जोडीने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला असून अवघ्या ७ दिवसांत या फिल्मने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. आठवड्याभरातच ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली आहे.
advertisement
2/8
दरम्यान, सध्या 'धुरंधर'च्या निर्मात्यांना एक वेगळंच टेन्शन सतावतंय. बॉक्स ऑफिसवर धुरंधरने बक्कळ कमाई केली असली, तरीही नुकतंच रिलीज झालेल्या फिल्मने 'धुरंधर'ला मोठा झटका दिला आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये या फिल्मने १३०० कोटींची कमाई करून 'धुरंधर'ला तगडी टक्कर दिली आहे.
advertisement
3/8
हा सिनेमा आहे ऑस्कर नामांकित अभिनेता रायन गोसलिंग याचा 'प्रोजेक्ट हेल मेरी' (Project Hail Mary). आदित्य धर यांच्या स्पाई-थ्रिलरला टक्कर देण्यासाठी हा सायन्स-फिक्शन सिनेमा आता भारतातही धडकला आहे.
advertisement
4/8
'धुरंधर २' रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २० मार्चला ही फिल्म रिलीज झाली. ओपनिंग वीकेंडमध्येच जी कामगिरी करून दाखवली आहे, त्याने 'धुरंधर'च्या निर्मात्यांना घाम फोडला आहे. अवघ्या ७२ तासांत या चित्रपटाने १४४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १३२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
advertisement
5/8
एकट्या उत्तर अमेरिकेत ४००० हून अधिक स्क्रीनवर या चित्रपटाने ८०.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ७५० कोटी रुपये कमावून नवा विक्रम केला. अमेरिकेबाहेर या चित्रपटाने ५६३ कोटींची कमाई केली आहे.
advertisement
6/8
भारतात हा चित्रपट आज, २६ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी या फिल्मला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. दिग्दर्शक लॉर्ड आणि क्रिस्टोफर मिलर यांच्या या चित्रपटाची कथा अशा एका व्यक्तीभोवती फिरते, जो एका अंतराळ यानात शुद्धीवर येतो, पण त्याला स्वतःबद्दल काहीच आठवत नसते.
advertisement
7/8
हळूहळू त्याला जाणीव होते की, संपूर्ण मानवजातीला वाचवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. रायन गोसलिंगसोबत 'रॉकी' नावाच्या एका एलियन पात्राची मैत्री प्रेक्षकांना भावूक करत आहे. चित्रपटात रायन गोसलिंग, सँड्रा हुलर आणि भारतीय वंशाची अभिनेत्री प्रिया कंसारा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
8/8
'धुरंधर २' च्या वेगाला या हॉलिवूडच्या फिल्मने ब्रेक लावला आहे का? आदित्य धर यांच्या चित्रपटाने भारतात ७४५ कोटींची कमाई केली असली, तरी मल्टीप्लेक्समध्ये आता 'प्रोजेक्ट हेल मेरी' कडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अवघ्या 72 तासांत 1300 कोटींची कमाई! 'ही' नवी फिल्म 'धुरंधर'साठी ठरली डोकेदुखी, बॉक्स ऑफिसवर केला कब्जा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल