आईचं दुसरं लग्न, साक्षीदार अन् एकटेपणा! गिरिजा ओकची अशी बाजू, आजवर कधीच आली नाही समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री गिरिजा ओकची आजवर कधीच समोर आलेली बाजू. गिरिजानं तिच्या आईच्या लग्नाची, आयुष्यात आलेल्या एकटेपणाविषयी सांगितलं
advertisement
1/9

सध्या नॅशनल क्रश म्हणून संपूर्ण जगाला माहिती झालेली अभिनेत्री गिरिजा ओक. आजवर गिरिजाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तिनं सर्वांसमोर आणल्या आहेत. तिचं बालपण, आई-वडिलांचा डिवोर्स, तिचं लग्न, मुलगा, सिनेमा, नाटक, जाहिराती ते नॅशनल क्रश होण्यापर्यंतचा सगळा प्रवास तिच्या चाहत्यांना माहिती आहे. पण गिरिजा ओकच्या आयुष्यातील अशी एक बाजू जी पहिल्यांदाच जगासमोर आली आहे.
advertisement
2/9
गिरिजानं स्वत:च्या लग्नाची बोलणी स्वत:च केली होती. पण तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाची बोलणी ते तिच्या लग्नात साक्षीदार म्हणून सही करण्यापर्यंतचा प्रवासही तिनं केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना गिरिजानं याविषयी सांगितलं.
advertisement
3/9
आई-वडिलांचा डिवोर्स, दोघांचं दुसरं लग्न आणि त्यानंतर आलेलं एकटेपण याविषयी गिरिजा बोलली. दिल के करीबशी बोलताना गिरिजा म्हणाली, "मी जेव्हा खूप काम करू लागले, लग्न झालं नव्हतं आणि लग्ना झाल्यानंतरही पुढची काही वर्ष. तेव्हा मी एकटी राहायचे. लग्नानंतर मी आणि सुह्रत एकत्र राहायचो पण कामानिमित्त तोही बाहेर असायचा. कबीरच्या जन्मानंतरही मी कामानिमित्त मुंबईत असयाचे तेव्हा मी एकटी असायचे."
advertisement
4/9
"आपल्याकडे 12 तासांच्या शिफ्ट असतात. प्रवासाचे तास पकडून कधी 16 तास आपण घराबाहेर असतो. घरी कोणीच नसणं मला आवडायचं नाही. माझ्या घरातील सगळे हेच काम करत असल्याने सगळे तसेच बिझी असायचो. कोणाच्या काही वेळा ठरलेल्या नाही."
advertisement
5/9
"कधी कधी मला असं खूप वाटायचं की आता जर आई माझ्या बरोबर असती तर मला गरम जेवण मिळालं असतं, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं असतं. तेव्हा मला तिची खूप आठवण यायची."
advertisement
6/9
गिरिजा पुढे म्हणाली, "माझ्या लग्नाच्या थोडं आधी तिचं दुसरं लग्न झालं होतं. तिने जेव्हा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला आणि तिने मला हे सांगितलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पुन्हा आपलं आयुष्य उभं करायला हिंमत लागते. अनेक बायकांना असं वाटतं की पुन्हा यात कोण पडणार."
advertisement
7/9
"मला माझ्या आईचं खूप कौतुक वाटतं तिने पुन्हा आपलं आयुष्य उभं केलं. पुन्हा आपलं सुख पुन्हा आपल्या हातानं घडवलं, या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. कशाला उगाच.. मी पडून राहते एका कोपऱ्यात असा विचार तिने केला नाही."
advertisement
8/9
गिरिजा पुढे म्हणाली, "तिने तिचं घर, तिची मुलं, तिचा नवरा यांच्याबरोबर एक नवं नातं निर्माण केलं. आणि त्या वयात हे सगळं करणं खूप कठिण होतं. त्याच्याबद्दलचे सगळे निर्णय आम्ही एकत्र घेतले. या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटायचं. ते जेव्हा होत असतं तेव्हा आपल्याला खूप कौतुक आणि भारी वाटत असतं. तिच्या लग्नात मी साक्षीदार म्हणून सही केली आहे."
advertisement
9/9
"मला खूप आनंद व्हायचा. पण मग कधी तरी ही गोष्टही यायची की माझी आई माझ्याजवळ का नाहीये", अशी खंत कायम गिरिजाला वाटायची.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आईचं दुसरं लग्न, साक्षीदार अन् एकटेपणा! गिरिजा ओकची अशी बाजू, आजवर कधीच आली नाही समोर