'... तर कॉलर पकडून त्याला घेऊन जाईन', 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर हार्दिकच्या आईने सगळ्यांना दिला होता इशारा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तुझ्यात जीव रंगला या मालिकेला इतकी लोकप्रियता मिळाली होती की हार्दिक आणि अक्षयाला भेटायला सेटवर दररोज अडीच-तीन हजार लोक यायचे. एक दिवस हार्दिकशी आई सेटवर आली आणि तिनं हार्दिकला प्रोड्यूसर समोर घरी घेऊन जाण्याचा इशारा दिला होता.
advertisement
1/7

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी. या मालिकेमुळे हार्दिक यशाच्या शिखरावर पोहोचला. राणा दाला पाहण्यासाठी लोक कोल्हापूरला शूटींगच्या सेटवर जायचे. सेटच्या बाहेर दररोज अडीच-तीन हजार लोक यायचे. याच सेटवर हार्दिकच्या आईने मालिकेच्या प्रोड्यूसरला ... तर मी त्याची लॉक पकडून त्याला घेऊन जाईन असं सांगितलं होतं. त्या असं का म्हणाल्या होत्या?
advertisement
2/7
मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हार्दिकनं त्याच्या प्रसिद्ध आणि यशाबद्दल सांगितलं. इतकं यश मिळूनही त्याचे जमिनीवर कसे हे देखील त्यानं सांगितलं. तो म्हणाला, "यश, प्रसिद्धीचं ओझ मी ठेवलंच नाही. मी सक्सेस डोक्यात जाऊ दिला नाही. ते सक्सेस माझ्या एकट्याचं नाहीये. प्रेक्षकांनी मला डोक्यावर घेतलं, रोड वाड्याच्या बाहेर अडीच-तीन हजार लोकं येतायत, हे मला वाटतं त्या कथानकाचं यश आहे. त्या कृपेनं कुठेतरी मला मिळालं."
advertisement
3/7
"मी फार सेलिब्रेटी झोनमध्ये राहत नाही. मला ते फार आवडत नाही. मला साधच आवडतं. पहिल्यापासून माझा हा स्वभाव आहे. माझ्या आई वडिलांची शिकवण आहे."
advertisement
4/7
हार्दिकने मालिकेच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "खरं वाटणार नाही पण माझी आई तीन चार महिन्यांनी मला न सांगता यायची. आमचं जिथे शूट चालू होतं तिथल्या मुलांमध्ये ती फिरायची. ती आली आहे मला माहितीच नसायचं. ज्या बसने मी यायचो त्या बसचे ड्रायव्हर मला सांगायचे की, तुमचे आई-बाबा आलेत."
advertisement
5/7
"ती चौकशी करायची की, हार्दिक तुमच्याशी कसा वागतो, त्याच्या डोक्यात हवा गेलीये का? तो माज करतो का? ती आमच्या स्पॉट दादांना विचारची की हा कसा वागतो? अॅटिट्यूडमध्ये असतो का? शानपणा करतो का?"
advertisement
6/7
"स्मृती शिंदे आमच्या प्रोड्यूसर होत्या. त्यांना माझ्या आईने सांगून ठेवलं होतं की, तुम्हाला जर वाटलं की हा माज करतोय तर याची कॉलर पकडून याला घरी घेऊन जाईन. हे तिने स्पष्ट सांगितलं होतं."
advertisement
7/7
हार्दिक पुढे म्हणाला, "ही भीती असणं चांगली गोष्ट आहे. ही भीती आईच्या आशीर्वादाने होते. हे यश क्षणिक आहे. मोठे मोठे कलाकार आहेत त्यांनी यश खालीवर पाहिलं आहे तर आपण कुठे आहोत. आपण तर त्यांच्यासमोर कोणीच नाही हे मी नेहमीच समजतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'... तर कॉलर पकडून त्याला घेऊन जाईन', 'तुझ्यात जीव रंगला'च्या सेटवर हार्दिकच्या आईने सगळ्यांना दिला होता इशारा