TRENDING:

हेमा मालिनी-धर्मेंद्र यांची ब्लॉकबस्टर, ज्यामधून भारताला मिळाले 4 खासदार! एकीने शांततेत केलं काम, दुसरीने गाजवली संसद

Last Updated:
Bollywood Blockbuster Movie: या एकाच चित्रपटाने भारतीय संसदेला चक्क चार खासदार दिले आहेत. रुपेरी पडद्यावर व्हिलनचा सामना करणारे हे वीर पुढे जाऊन देशाचं धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी बनले.
advertisement
1/8
हेमा मालिनी-धर्मेंद्र यांची ब्लॉकबस्टर, ज्यामधून भारताला मिळाले 4 खासदार!
भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आले ज्यांनी रेकॉर्ड्स बनवले, पण 'शोले' सारखा चमत्कार पुन्हा घडला नाही. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले नाहीत, तर भारतीय प्रेक्षकांच्या मनात असं काही घर केलं की आजही या चित्रपटाची चर्चा होते.
advertisement
2/8
पण तुम्हाला माहिती आहे का? या एकाच चित्रपटाने भारतीय संसदेला चक्क चार खासदार दिले आहेत. होय, रुपेरी पडद्यावर डाकूंचा सामना करणारे हे वीर पुढे जाऊन देशाचं धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी बनले.
advertisement
3/8
'शोले'मधील कलाकारांनी राजकारणात मारलेली एन्ट्री एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. या चित्रपटातील एक-दोन नव्हे तर तब्बल चार प्रमुख चेहरे खासदारकीच्या खुर्चीपर्यंत पोहोचले.
advertisement
4/8
धर्मेंद्र (वीरू): आपल्या राऊडी स्टाईलने बसंतीला जिंकणारा 'वीरू' खऱ्या आयुष्यातही लोकनेता ठरला. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर राजस्थानच्या बिकानेरमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली आणि ते खासदार झाले.
advertisement
5/8
हेमा मालिनी (बसंती): 'धन्नो'ला पळवणारी बसंती म्हणजेच आपली 'ड्रीम गर्ल' आजही सक्रिय राजकारणात आहे. भाजपच्या तिकिटावर मथुरेतून त्या सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे.
advertisement
6/8
जया बच्चन (राधा): चित्रपटात अत्यंत शांत आणि संयमी 'राधा' साकारणाऱ्या जया बच्चन यांनी राजकारणात मात्र जोरदार फटकेबाजी केली. समाजवादी पार्टीच्या वतीने त्या २००४ पासून सलग राज्यसभेच्या सदस्य आहेत.
advertisement
7/8
अमिताभ बच्चन (जय): 'जय'ची भूमिका अजरामर करणाऱ्या बिग बींनीही राजकारणाची चव चाखली आहे. १९८४ मध्ये त्यांनी अलाहाबादमधून विक्रमी मतांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती, मात्र नंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
advertisement
8/8
नुसते कलाकारच नाही, तर या महाकाव्याचे लेखक जावेद अख्तर यांनीही २०१० ते २०१६ या काळात राज्यसभेचे मनोनीत सदस्य म्हणून संसदेत आपला ठसा उमटवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हेमा मालिनी-धर्मेंद्र यांची ब्लॉकबस्टर, ज्यामधून भारताला मिळाले 4 खासदार! एकीने शांततेत केलं काम, दुसरीने गाजवली संसद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल