Firing On Singer House : प्रसिद्ध गायिकेच्या घरावर गोळीबार, महिलेला अटक; कोण आहे ती, कारण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Singer Rihanna House Firing : प्रसिद्ध गायिकेच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
advertisement
1/5

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराजवळ गोळीबार झाला होता. आता एका प्रसिद्ध गायिकेच्या घरावर गोळीबार झाल्याची बातमी आली आहे. गायिकेच्या घरावर बऱ्याच गोळ्या फायर करण्यात आल्या आहेत.
advertisement
2/5
ही गायिका आहे पॉपस्टार रिहाना. लॉस एंजेलिसमधील बेव्हरली हिल्स इथं तिचं घर आहे, जिथं गोळीबार करण्यात आला. ही घटना 8 मार्च रोजी रविवारी घडली.
advertisement
3/5
यानंतर पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा रिहाना तिचा पार्टनर आणि ती मुलांसह घरातच होती. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
4/5
गोळीबार करणारा आरोपी गाडीतून आला आणि अंदाजे 10 गोळ्या फायर केल्या, असं लॉस एंजेलरिस पोलीस विभागाच्या रेडिओ डिस्पॅच ऑडिओवरून समजलं आहे.
advertisement
5/5
दरम्यान गोळीबार करणारी महिला असल्याचं सांगितलं जातं आहे. संशयित आरोपी म्हणून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पण ती कोण हे अद्याप सांगितलेलं नाही. तसंच गोळीबारामागील कारणही अद्याप माहिती नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Firing On Singer House : प्रसिद्ध गायिकेच्या घरावर गोळीबार, महिलेला अटक; कोण आहे ती, कारण काय?