TRENDING:

Shukra Gochar 2026: पैसेवाला ग्रह आता साथ सोडणार, या 5 राशी धडाम लॉसमध्ये, अचानक आर्थिक संकट!

Last Updated:
Shukra Gochar 2026: सुख, संपत्ती, पैशाचा कारक शुक्र ग्रहाला मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोप्या भाषेत शुक्राला आपण पैसेवाला ग्रह असे म्हणू शकतो. येत्या 15 मार्च 2026 रोजी शुक्र आपली चाल बदलून रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध असल्याने शुक्राचा हा गोचर संमिश्र परिणाम देणारा ठरेल.
advertisement
1/5
पैसेवाला ग्रह आता साथ सोडणार; या 5 राशी धडाम लॉसमध्ये, अचानक आर्थिक संकट!
ज्योतिषीय गणनेनुसार शुक्राचा हा बदल 5 राशींच्या लोकांसाठी आर्थिक आणि व्यावहारिक आव्हाने घेऊन येणार आहे. या काळात नेमक्या कोणत्या राशींनी सावध राहणे गरजेचे आहे, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/5
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा नक्षत्र बदल अनावश्यक खर्चात मोठी वाढ करणारा ठरेल. स्वतःच्या सुख-सोयी आणि चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या बचतीचा मोठा हिस्सा खर्च करून टाकू शकता. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत जोखमीचा आहे. शेअर बाजार किंवा कोणत्याही नवीन व्यवसायात मोठी रक्कम गुंतवणे सध्या टाळा. कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार किंवा देवाणघेवाण सध्या लांबणीवर टाकणेच तुमच्या हिताचे ठरेल.
advertisement
3/5
कर्क - शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन तुमच्या नशिबाच्या मार्गात काही अडथळे निर्माण करू शकते. तुमची ठरलेली किंवा पूर्णत्वास आलेली कामे अचानक थांबू शकतात, ज्यामुळे मानसिक आणि आर्थिक ताण वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत घरातील मोठ्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शांत राहून वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक नियम आणि अट नीट वाचून घ्या, अन्यथा भविष्यात फसवणूक होऊ शकते.
advertisement
4/5
सिंह राशीच्या लोकांसाठी हा गोचर अनपेक्षित समस्या घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात आर्थिक नुकसानीची शक्यता असल्याने व्यवहार करताना डोळे उघडे ठेवा. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्यास अडचण येईल. तसेच, अचानक उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर खर्च वाढल्यामुळे तुमच्या बचतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
advertisement
5/5
धनु राशीच्या लोकांचा घरगुती कामात किंवा वाहनावर अचानक मोठा खर्च करावा लागू शकतो. घरातील वातावरण काहीसे तणावाचे राहिल्यामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होईल. जर तुम्ही जमीन, घर किंवा अचल संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या थांबणे योग्य ठरेल. अशा व्यवहारांमध्ये पैसा अडकण्याची दाट शक्यता आहे. अनावश्यक खरेदी टाळून पैशांचे योग्य नियोजन करणे या काळात अत्यंत आवश्यक आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar 2026: पैसेवाला ग्रह आता साथ सोडणार, या 5 राशी धडाम लॉसमध्ये, अचानक आर्थिक संकट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल