TRENDING:

भारतातील युट्यूबवर सर्वाधिक पाहिलं जाणारं गाणं कोणतं? आजही आहे नंबर 1

Last Updated:
Highest Viewed Songs on YouTube : युट्यूबवर अनेक गाणी उपलब्ध आहेत. पण आज भारतातील युट्यूबवर सर्वाधिक पाहिलं जाणारं गाणं कोणतं आहे हे जाणून घ्या.
advertisement
1/7
भारतातील युट्यूबवर सर्वाधिक पाहिलं जाणारं गाणं कोणतं? आजही आहे नंबर 1
भारतात संगीताचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक जण आपल्या मूडनुसार गाणी ऐकतात आणि त्यासाठी यूट्यूब हे सर्वोत्तम माध्यम ठरतं. यूट्यूबवर चित्रपट, मालिका, वेब सीरीज, वैयक्तिक व्लॉग्स असे बरेच काही अपलोड केले जाते, पण गाण्यांची लोकप्रियता कधीही कमी होणारी नाही. चित्रपटातील गाणी असोत, अल्बम सॉन्ग्स असोत किंवा भक्तिगीते लोक ती शोधतच राहतात आणि त्यामुळे त्यांचे व्ह्यूजही वाढत जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारे हिंदी गाणे कोणते आहे? जाणून घ्या.
advertisement
2/7
श्री हनुमान चालीसा (Shree Hanuman Chalisa) : गुलशन कुमार यांच्या आवाजातील टी-सीरिजची ओरिजिनल हनुमान चालीसा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हे स्तोत्र अनेक वेळा पाहिले गेले असून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाहिले जात आहे. त्यामुळेच यूट्यूबवर याला तब्बल 5 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अद्याप कोणत्याही गाण्याला 'हनुमान चालीसा'चा रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही.
advertisement
3/7
लहंगा (Lehanga) : जस मानक यांचे ‘लहंगा’ हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले आहे. या गाण्याला आतापर्यंत 1.8 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यात जस मानकसोबत माहिरा शर्मा दिसते. हे गाणे एका मुला-मुलीमधील संवादावर आधारित आहे, ज्यात मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडे लहंगा घेण्याचा हट्ट धरते.
advertisement
4/7
52 गज का दामन (52 Gaj Ka Daman) : प्रांजल दहिया यांचे '52 गज का दामन' हे गाणं प्रत्येक लग्नसमारंभ आणि मेहफिलीची शान बनले आहे. यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत 1.7 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. याचा व्हिडिओदेखील प्रेक्षकांना खूप आवडतो. हे गाणे 2020 मध्ये रिलीज झाले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत लोकांचे आवडते गाणे आहे.
advertisement
5/7
वास्ते (Vaaste) : ध्वनी भानुशाली यांच्या आवाजातील 'वास्ते' या गाण्यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. 'वास्ते' या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 1.6 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. टी-सीरिजच्या बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या गाण्यात ध्वनीसोबत निखिल डिसूझाने गायन केले असून तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे.
advertisement
6/7
जरूरी था (Zaroori Tha) : राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील 'जरूरी था' हे गाणे लोकांना खूप भावते. या गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत 1.6 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याच्या व्हिडिओमध्ये कुशल टंडन आणि गौहर खान झळकले होते.
advertisement
7/7
राउडी बेबी (Rowdy Baby) : धनुष आणि साई पल्लवी यांच्या ‘मारी 2’ चित्रपटातील ‘राउडी बेबी’ हे गाणेही प्रचंड लोकप्रिय आहे. यूट्यूबवर या गाण्याला 1.6 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील धनुष आणि साई पल्लवी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यामुळेच हे गाणं वारंवार पाहिले जातं. हे गाणं स्वतः धनुष यांनी गायिका डी (Dhee) हिच्यासोबत गायले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारतातील युट्यूबवर सर्वाधिक पाहिलं जाणारं गाणं कोणतं? आजही आहे नंबर 1
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल