Prakash Raj FIR : 'फिल्म नाही, खऱ्या आयुष्यातही व्हिलनच!', प्रकाश राज यांच्यावर देशद्रोहाचा आरोप, FIR दाखल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prakash Raj FIR : प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर 'हिंदू सेना'ने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे देशद्रोहाची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
advertisement
1/9

साऊथ सिनेमातील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
advertisement
2/9
एका जाहीर सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्याविरोधात थेट दिल्ली पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘हिंदू सेना’ या संघटनेने त्यांच्यावर देशद्रोह आणि धार्मिक भावना भडकावल्याचा गंभीर आरोप केला आहे.
advertisement
3/9
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रकाश राज यांनी एका सभेमध्ये CAA आणि NRC च्या विरोधात लोकांना भडकावणारे भाषण दिले.
advertisement
4/9
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी NSA अंतर्गत तुरुंगात असलेल्या आरोपींना ‘समाजाचे खरे हिरो’ आणि ‘भविष्याचे नेते’ असं म्हटलं. विष्णु गुप्ता यांनी तक्रारीत स्पष्ट केलं आहे की, प्रकाश राज यांचे हे बोल दिल्लीमध्ये दंगल भडकावण्याचा मोठा कट असू शकतो.
advertisement
5/9
याशिवाय, प्रकाश राज यांनी ‘ही जमीन सगळ्यांची आहे, कोणीही कुठेही राहू शकतं’, असं वक्तव्य करून बेकायदेशीर घुसखोरांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement
6/9
तक्रारीमध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. प्रकाश राज यांनी बॉलिवूडचं उदाहरण देत, सरकार मुस्लिम लेखक, कलाकार आणि अभिनेत्यांना त्रास देत असल्याची ‘खोटी कहाणी’ रचल्याचं हिंदू सेनेचं म्हणणं आहे.
advertisement
7/9
हिंदू सेनेचे म्हणणे आहे की, प्रकाश राज पडद्यावर व्हिलन आहेत, पण आता ते खऱ्या आयुष्यातही देशाविरोधात काम करत आहेत.
advertisement
8/9
दिल्ली पोलिसांनी ही तक्रार मिळाली असल्याची पुष्टी केली आहे आणि आता पोलीस दलाचा कायदेशीर विभाग या प्रकरणाची गंभीरपणे तपासणी करत आहे.
advertisement
9/9
पुरावे मिळाल्यास प्रकाश राज यांना लवकरच समन्स पाठवलं जाऊ शकतं. याप्रकरणी प्रकाश राज यांनी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि त्यांचा फोनही बंद येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prakash Raj FIR : 'फिल्म नाही, खऱ्या आयुष्यातही व्हिलनच!', प्रकाश राज यांच्यावर देशद्रोहाचा आरोप, FIR दाखल