TRENDING:

रोशन घराण्याची सून होणार होती ही अभिनेत्री; पण आता क्रिकेटरसोबत रंगल्या अफेअरच्या चर्चा

Last Updated:
आज आम्ही तुम्हाला ज्याअभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिचं नाव एका इंडियन क्रिकेटरशी जोडलं गेलं. त्याच्याआधी तिचं हृतिक रोशनच्या भावाशी अफेअर होतं. या अभिनेत्रीच्या लव्हलाईफची खूप चर्चा होते. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या.
advertisement
1/8
रोशन घराण्याची सून होणार होती ही अभिनेत्री; क्रिकेटरसोबत रंगल्या अफेअरच्या चर्चा
काही दिवसांपूर्वी शुभम गिलसोबत अफेअरच्या चर्चा रंगलेली अभिनेत्री म्हणजे रिद्धिमा पंडित. ही अभिनेत्री टीव्हीपासून ओटीटीपर्यंत उल्लेखनीय काम करत आहे.
advertisement
2/8
रिद्धिमा पंडितचा जन्म 25 जून 1990 रोजी मुंबईत झाला. तिची आई जयश्री गुजराती आणि वडील मराठी आहेत. रिद्धिमा पंडितला 'बहु हमारी रजनीकांत' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर ती खतरों के खिलाडी सीझन 9 आणि बिग बॉस ओटीटी सीझन 1 मध्ये देखील दिसली.
advertisement
3/8
रिद्धिमा पंडितने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. सुरुवातीला अनेक मोठ्या उत्पादनांचे मॉडेलिंग करून ती प्रसिद्ध झाली. सनसिल्क, फेअर अँड लव्हली, डव, हार्पिक आणि वीक यांसारख्या जाहिरातींमध्ये ती दिसली. त्यानंतर 2016 मध्ये त्याने टीव्ही जगतात पदार्पण केले. तिची पहिली मालिका 'बहू हमारी रजनीकांत' ही होती, ज्यासाठी तिला गोल्ड अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
advertisement
4/8
नंतर ती रिद्धिमा पंडित या वेब सीरिजमध्येही दिसली. त्यानंतर तिने एकता कपूरची रोमँटिक मालिका 'हम: आय एम बिज ऑफ अस' मध्येही काम केलं. 2019 मध्ये, ती रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 9' या शोमध्ये आली आणि दुसरी रनर अप ठरली.
advertisement
5/8
रिद्धिमा पंडितने रवीना टंडनची मॅनेजर म्हणून काम केलं आहे. एवढेच नाही तर रवीना टंडनची मुलगी राशा तिची खूप चांगली मैत्रीण आहे. रिद्धिमा पंडितच्या फोटोंवर राशाच्या कमेंट्स तुम्हाला अनेकदा पाहायला मिळतात.
advertisement
6/8
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत स्वतः रिद्धिमा पंडितने याविषयी खुलासा केला होता. एक काळ असा होता जेव्हा ती हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
advertisement
7/8
दोघांमध्ये चांगले संबंध होते, एवढंच नाही तर दोघे लवकरच लग्नही करणार होते. पण त्यानंतर 10 वर्षांच्या नात्यानंतर त्यांचं नातं तुटलं. ईशान रोशन हा राकेश रोशनचा भाऊ राजेश रोशनचा मुलगा आहे.
advertisement
8/8
काही महिन्यांपूर्वी रिद्धिमा पंडितचं नाव क्रिकेटपटू शुभम गिलसोबतही जोडलं गेलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाचीही चर्चा होती. पण अभिनेत्रीने ते दोघे एकमेकांना ओळखतही नाहीत असा खुलासा केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रोशन घराण्याची सून होणार होती ही अभिनेत्री; पण आता क्रिकेटरसोबत रंगल्या अफेअरच्या चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल