Hruta Durgule husband : हृता दुर्गुळेचा नवरा खरंच गुजराती आहे का? कोण आहे प्रतीक शाह, करतो काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hruta Durgule husband Prateek Shah : हृता दुर्गुळेचा नवरा कोण आहे? तो गुजराती आहे का? हृताने केलंय गुजराती मुलाशी लग्न? मराठी टेलिव्हिजनची प्रसिद्ध नायिका हृता दुर्गुळे सध्या मालिकेत दिसत नाहीये. तब्बल १० वर्ष हृताने मराठी टेलिव्हिजनवर काम केलं. एकाहून हिट मालिकांची नायिका म्हणून ती प्रसिद्ध झाली. महाराष्ट्राची क्रश असं नाव हृताला देण्यात आलं. ही महाराष्ट्राची क्रश नेमकी कोणाच्या प्रेमात पडते याकडे सर्वांचं लक्ष होतं.
advertisement
1/12

मन उडू उडू झालं या मालिकेत काम करत असताना हृताने प्रतीक शाहबरोबर लग्न केलं.
advertisement
2/12
18 मे 2022 साली हृता आणि प्रतीक यांनी लग्न केलं. लग्नानंतर हृताचा नवरा चर्चेत आला होता.
advertisement
3/12
हृताचा नवरा गुजराती आहे. महाराष्ट्राच्या क्रशने गुजराती मुलाशी लग्न केलं अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
advertisement
4/12
प्रतीकच्या आडनावावरून अनेकांना तो गुजराती असल्याचा अंदाज लावला होता. अनेक महिन्यांनी हृताने नवऱ्याच्या आडनावाबद्दल खुलासा केला होता.
advertisement
5/12
एका मुलाखतीत बोलताना हृताला प्रश्न विचारण्यात आला की, 'प्रतीक गुजराती आहे का?' याचं उत्तर देताना हृता म्हणाली, "मी कोणाशीही लग्न करेन. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे."
advertisement
6/12
"शाह आहे गुजराती मुलगाच का? मराठी मुलाशी का लग्न नाही करणार. माझ्या आई वडिलांना काही प्रॉब्लेम नाहीये मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे."
advertisement
7/12
हृता पुढे म्हणाली, "प्रतीक हा गुजराती नाही. तो महाराष्ट्रीयन आहे."
advertisement
8/12
"शाह म्हणजे ते सोलापूरचे शाह जे आधी शिफ्ट झाले होते. आम्ही घरी पूर्णपणे मराठीमध्ये बोलतो."
advertisement
9/12
"माझ्या सासूबाई मँगलोरियन आहेत. त्यामुळे आमच्याकडे विविध संस्कृतीचा मेळ आहे
advertisement
10/12
हृताच्या नवऱ्याबद्दल सांगायचं झाल्यास प्रतीक हा हिंदी टेलिव्हिजन मालिकांचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
advertisement
11/12
प्रतीकने 'प्यार का पहला नाम: राधा मोहन', 'एक दीवाना था', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', आणि 'सद्दा हक' सारख्या मालिकांसाठी काम केलं आहे.
advertisement
12/12
तर हृताची सासू देखील प्रसिद्ध अभिनेत्री असून मुग्धा शाह असं त्यांचं नाव आहे. हृताने 'दुर्वा' या तिच्या पहिल्या मालिकेत सासूबाईंबरोबर काम केलं होतं. मुग्धा शाह या मालिकेत हृताच्या आईच्या भूमिकेत होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hruta Durgule husband : हृता दुर्गुळेचा नवरा खरंच गुजराती आहे का? कोण आहे प्रतीक शाह, करतो काय?