TRENDING:

IND vs ENG: बॉलिवूडच्या 'नायक'ने क्रिकेटच्या मैदानावरील 'या' हिरोसमोर जोडले हात, वानखेडेवर नेमकं काय घडलं?

Last Updated:
IND vs ENG: या सगळ्या रणधुमाळीत चर्चा रंगली आहे ती टीम इंडियाच्या पॉवरप्लेमधील फटकेबाजीची आणि स्टँड्समध्ये बसलेल्या बॉलिवूडच्या झकास अभिनेत्याच्या रिअॅक्शनची.
advertisement
1/7
बॉलिवूडच्या 'नायक'ने क्रिकेटच्या मैदानावरील 'या' हिरोसमोर जोडले हात, PHOTOS
मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे मैदान... भारत विरुद्ध इंग्लंड हा हाय-व्होल्टेज सेमीफायनलचा सामना... आणि हवेत घुमणारा 'संजू... संजू...' असा एकच जयघोष! आज वानखेडेवर क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतोय.
advertisement
2/7
जो संघ जिंकणार, तो थेट फायनलचं तिकीट बुक करणार, त्यामुळे मैदानात रक्ताचं पाणी करून दोन्ही संघ झुंजत आहेत. पण या सगळ्या रणधुमाळीत चर्चा रंगली आहे ती टीम इंडियाच्या पॉवरप्लेमधील फटकेबाजीची आणि स्टँड्समध्ये बसलेल्या बॉलिवूडच्या झकास अभिनेत्याच्या रिअॅक्शनची.
advertisement
3/7
भारत आणि इंग्लंड डावाची सुरुवात करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले. चाहत्यांना अपेक्षा होती की ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करेल. संजूने तर येताच वादळ निर्माण केलं. अवघ्या २० चेंडूत ४१ धावा कुटत त्याने पॉवरप्लेमध्ये भारताला ६७ धावांपर्यंत मजल मारून दिली.
advertisement
4/7
पण दुसरीकडे, युवा तुफान अभिषेक शर्माने मात्र पुन्हा एकदा घोर निराशा केली. विल जॅक्सच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये एक स्लोअर चेंडू टोलवण्याच्या नादात अभिषेकने फिल सॉल्टच्या हातात सोपा झेल दिला. फक्त ९ धावांवर बाद होऊन अभिषेक डगआऊटच्या दिशेने परतला.
advertisement
5/7
मैदानात संजू सॅमसन ज्या पद्धतीने इंग्लंडच्या बॉलरची पिसं काढत होता, ते पाहून स्टँड्समध्ये बसलेले बॉलीवूडचे एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर स्वतःवरचं नियंत्रण विसरले. संजूने मारलेला एक जबरदस्त सिक्स पाहून अनिल कपूर चक्क आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी संजूला हात जोडून नमस्कार केला.
advertisement
6/7
बॉलिवूडच्या 'नायक'ने संजूच्या या खेळीला दिलेला हा मान पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनिल कपूर यांच्या चेहऱ्यावरील ती उत्सुकता आणि संजूबद्दलचा आदर पाहून क्रीडाप्रेमीही भारावून गेले आहेत. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंड होतोय.
advertisement
7/7
पॉवरप्लेमध्ये भारताने दमदार सुरुवात केली असली, तरी अभिषेकच्या विकेटमुळे इंग्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरत असली, तरी इंग्लंडचे फिरकीपटू मधल्या षटकांत काय जादू करतात, यावर भारताचं फायनलचं स्वप्न अवलंबून असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IND vs ENG: बॉलिवूडच्या 'नायक'ने क्रिकेटच्या मैदानावरील 'या' हिरोसमोर जोडले हात, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल