IPL 2025: RCB च्या विजयाने प्रीती झिंटाचं किती कोटींचं नुकसान? मनातलं दुःख लपवत चेहऱ्यावर आणलं हसू
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
IPL 2025 Preity Zinta Loss: क्रिकेटचा महाकुंभ IPL 2025 अखेर पार पडलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच IPL चषक उचलला. पंजाब किंग्सला हरवून त्यांनी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
advertisement
1/7

क्रिकेटचा महाकुंभ IPL 2025 अखेर पार पडलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच IPL चषक उचलला. पंजाब किंग्सला हरवून त्यांनी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबीच्या चाहत्यांना विराट आनंद झाला मात्र पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
advertisement
2/7
पंजाब किंग्जने दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठली होती. पण शेवटच्या क्षणी त्यांच्या पदरी निराशाच आली. डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर वेदना घेऊन ती संघाला सांत्वन देत होती.
advertisement
3/7
आयपीएलच्या फायनल सामन्यात हरल्यानंतर प्रिती झिंटाला मोठ्या नुकसानाचाही सामना करावा लागला. प्रिती झिंटाला किती नुकसान झालं यावर एक नजर टाकूया.
advertisement
4/7
आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रत्येक संघाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. यंदा प्रिती झिंटाच्या टीमला या नुकसानीचा सामना करावा लागला.
advertisement
5/7
RCB ला चॅम्पियन ठरल्यानं 20 कोटी रुपये मिळाले. उपविजेता पंजाब किंग्जला मिळाले केवळ 12.5 कोटी रुपये मिळाले. हा फरक तब्बल7.5 कोटींचा आहे. जर पंजाबने अंतिम सामना जिंकला असता, तर त्यांच्या खात्यात 20 कोटींची ही रक्कम आली असती.
advertisement
6/7
विजेते संघाला मिळणारे ब्रँडिंग, स्पॉन्सरशिप डील्स, आणि जाहिरात उत्पन्न ही वाढीव कमाई देखील पंजाब गमावून बसला. त्यामुळे आता सामना गमावल्यानंतर प्रिती झिंटाच्या संघाला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ट्रॉफी गेली आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसानही झालं.
advertisement
7/7
दरम्यान, मुंबई इंडियन्सला तिसऱ्या स्थानासाठी 7 कोटी रुपये मिळाले. गुजरात टायटन्स चौथ्या स्थानासाठी 6.5 कोटी रुपये मिळाले. RCB चा 18 वर्षांनी मिळालेला ऐतिहासिक विजय जितका प्रेरणादायी होता, तितकाच पंजाब किंग्जचा संघर्ष आणि प्रीती झिंटाचा भावनिक प्रवास हृदयस्पर्शी ठरला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IPL 2025: RCB च्या विजयाने प्रीती झिंटाचं किती कोटींचं नुकसान? मनातलं दुःख लपवत चेहऱ्यावर आणलं हसू