बाहेर युद्ध अन् घरात इस्त्रायली कुटुंब पाहतंय हाय TRP असलेली ही मराठी मालिका, अभिनेत्री भारावली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी मालिकेचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. युद्धजन्य परिस्थितीत हाय TRP असलेली मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
advertisement
1/9

मराठी मालिकांचा आवाका फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित असतो असं म्हणतात. पण मराठी मालिकांचा प्रेक्षक वर्ग देशाबाहेरही आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
advertisement
2/9
परदेशातही मराठी मालिका आवडीनं पाहिल्या जातात हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे.
advertisement
3/9
अशा परिस्थितीमध्ये इस्त्राइलमध्ये हाय TRP असलेली मराठी मालिका पाहिली जात आहे. बाहेर सुद्ध सुरू आहे हे इस्त्रायली कुटुंब मराठी मालिका पाहत आहेत.
advertisement
4/9
युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबासाठी आनंदाचे क्षण ठरलेली ती मालिका म्हणजेच 'ठरलं तर मग'. मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिनं शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे ही माहिती समोर आली आहे.
advertisement
5/9
स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग' मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका भारताबाहेरही तितक्याच उत्साहाने पाहिली जाते. याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच समोर आलं.
advertisement
6/9
इस्त्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. डॅनियल कुटुंबाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, "सततच्या तणावपूर्ण वातावरणात ठरलं तर मग ही मालिका आमच्यासाठी एक दिलासा ठरते. आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ही मालिका पहातो. आम्हाला ही मालिका खूप आवडते. अर्जुन आणि सायली या मुख्य जोडीसोबतच प्रियाच्या अभिनयाचंही कौतुक."
advertisement
7/9
सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने हा व्हिडिओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली. जुई गडकरी म्हणाली, "गेले काही दिवस ठरलं तर मगची संपूर्ण टीम खूप मेहनत करतेय. 45 मिनीटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. काहीही झालं तरी ध्येय एकच एपिसोड थांबता कामा नये."
advertisement
8/9
"अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या इस्त्रायली प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं."
advertisement
9/9
"आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातून अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो याचा मला खूप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो", अशी भावना जुईने व्यक्त केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाहेर युद्ध अन् घरात इस्त्रायली कुटुंब पाहतंय हाय TRP असलेली ही मराठी मालिका, अभिनेत्री भारावली