TRENDING:

Jatin Suri : 'अनुपमा'च्या सेटवर गोंधळ, पोलिसांनी थेट अभिनेत्यालाच उचललं, पण नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
Anupama TV show : 'अनुपमा' शोमधील अभिनेता जतिन सूरीवर गर्लफ्रेंडने आरोप लावले आहेत. पोलिसांनी सेटवर जाऊन चौकशी केली.
advertisement
1/6
'अनुपमा'च्या सेटवर गोंधळ, पोलिसांनी थेट अभिनेत्यालाच उचललं, पण नेमकं प्रकरण काय?
लोकप्रिय टीव्ही शो ‘अनुपमा’ मधील ‘राजा कोठारी’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता जतिन सूरी सध्या चांगलाच अडकला आहे. एका वैयक्तिक वादामुळे त्याचे नाव चर्चेत आले असून, हा प्रकार इतका गंभीर झाला की या प्रकरणी थेट पोलिसांना कारवाई करावी लागली आहे.
advertisement
2/6
सध्या ३० वर्षीय जतिन सूरी जानेवारी २०२५ पासून ‘अनुपमा’ या टीआरपी टॉपर्सपैकी एक असलेल्या मालिकेत झळकत आहे. त्याने याआधीही ‘एक था राजा एक थी रानी’, ‘निमकी मुखिया’, ‘क्लास ऑफ 2020’, ‘सौभाग्यवती भव 2’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय, त्याने संगीत व्हिडिओ ‘गुजरा ज़माना’ मध्येही काम केले आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय असून, त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास 89.5k फॉलोअर्स आहेत.
advertisement
3/6
मिळालेल्या माहितीनुसार, जतिन सूरीवर त्याच्या गर्लफ्रेंडने ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप लावले आहेत. तिने यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि नंतर पोलीस थेट ‘अनुपमा’ च्या सेटवर पोहोचले. दोघांना तात्काळ चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या घटनेने सेटवरही खळबळ उडाली.
advertisement
4/6
जतिनच्या गर्लफ्रेंडने नेमके कोणत्या मुद्द्यावरून तक्रार केली आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. खुद्द जतिननेही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. इंडिया फोरमने यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर त्याने मौन बाळगणे पसंत केले. प्रोडक्शन हाऊस किंवा चॅनलनेही अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
advertisement
5/6
२०१३ साली त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयासोबतच २०२३ मध्ये त्याने स्वतःचे एक रेस्टॉरंटही सुरू केले आहे. अशा बहुपरिचित कलाकाराविरुद्ध असा आरोप होणे नक्कीच धक्कादायक आहे.
advertisement
6/6
‘अनुपमा’ मालिकेमध्ये रुपाली गांगुली, अद्रिजा रॉय आणि शिवम खजूरिया यांच्या प्रमुख भूमिका असून, ही मालिका सातत्याने टीआरपीच्या टॉप ३ यादीत झळकत असते. त्यामुळे या प्रकरणाचा शोच्या कामावर आणि वातावरणावर काही परिणाम होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Jatin Suri : 'अनुपमा'च्या सेटवर गोंधळ, पोलिसांनी थेट अभिनेत्यालाच उचललं, पण नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल