कर्जामुळे उद्ध्वस्त झाले होते जुही चावलाचे पती, आता 2000 कोटींचे मालक, IPL मधून उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
KKR Owner Jay Mehta Property : जूही चावलाचे पती जय मेहता यांनी एका मुलाखतीत सांगितलं की ते कर्जाच्या जाळ्यात अडकले होते आणि यामुळे ते जवळपास उद्ध्वस्त झाले होते.
advertisement
1/5

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने २००७ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील आपली क्रिकेट टीम, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विकत घेतली, पण तो एकटाच या कंपनीचा मालक नव्हता. आजही, शाहरुख आपली रेड चिलीज एंटरटेनमेंट पार्टनर जूही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्यासोबत या टीमचा मालक आहे. या तिघांनी जेव्हा ही टीम खरेदी केली, तेव्हा त्यांनी क्रिकेटच्या या नव्या फॉरमॅटमध्ये एक वेगळाच 'ग्लॅमर' आणला. त्यांची टीम जरी मैदानात खूप चांगली कामगिरी करत नसली तरी, सुपरस्टार मालकांमुळे त्यांना नेहमीच 'लाइमलाइट' मिळत असे.
advertisement
2/5
एका जुन्या मुलाखतीत, जय मेहता यांनी टीममध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना सांगितले की, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी या गुंतवणुकीला 'वेडेपणा' म्हटलं होतं, तरी त्यांना पूर्ण विश्वास होता की हे काम करेल. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) च्या YouTube चॅनलवर शेअर केलेल्या एका चॅटमध्ये, जय मेहता यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवातून काही शिकवणी शेअर करण्यास सांगितले होते.
advertisement
3/5
यावेळी जय मेहता यांनी सांगितलं, "सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खूप जास्त कर्ज घेऊ नका, कारण आम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकलो होतो आणि यामुळे आम्ही जवळपास उद्ध्वस्त झालो होतो. दुसरं, तुम्हाला एक उत्तम टीम तयार करावी लागेल, सर्वोत्तम लोकांना कामावर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा... मला वाटतं, पुन्हा एकदा, उत्सुकता, खूप काही वाचणे, व्यावसायिक पद्धतींबद्दल शिकणे, अशाच गोष्टी करणं नेहमीच फायद्याचं सिद्ध होतं. जे काही सध्या सुरू आहे, त्याबद्दल स्वतःला माहिती देत राहणे आणि स्वतःला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवणे. मला वाटतं की या महत्त्वाच्या गोष्टी आहेत."
advertisement
4/5
जय मेहता यांनी सांगितलं की, त्यांचा व्यवसाय त्यावेळी खूप कठीण परिस्थितीतून जात होता, जेव्हा त्यांना क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या इतर भागीदारांसोबत मिळून केकेआर खरेदी करण्यासाठी तब्बल ७५ मिलियन डॉलरची (सुमारे ६२५ कोटी रुपये) गुंतवणूक केली. ते म्हणाले, "या सगळ्या दरम्यान, जेव्हा आम्ही कठीण परिस्थितीतून जात होतो, तेव्हा मला क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. प्रत्येकजण म्हणत होता की, तुम्ही वेडे झाला आहात, पूर्णपणे वेडे. मी म्हणालो, 'बघा, मला खरंच यावर विश्वास आहे. मला हे करायचं आहे.' जेव्हा लिलाव झाला, तेव्हा ती ७५ मिलियन डॉलरच्याच्या अधिग्रहणासारखी होती आणि मी हे करण्यासाठी माझ्या एका मित्रासोबत भागीदारी केली होती, पण इतर लोकांनी खरंच कागदपत्रं घेतली होती आणि व्यवसाय मॉडेल समजून घेतलं नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही व्यवसाय मॉडेल पाहिलं, तेव्हा ते एक 'कॅश फ्लो' मॉडेल होतं."
advertisement
5/5
पुढे जय मेहता यांनी सांगितलं की, गुंतवणूक खूप छोटी होती, पण त्यांना विश्वास होता की क्रिकेटचा हा फॉरमॅट खूप मोठा होणार आहे. ते म्हणाले, "गुंतवणूक खूप छोटी होती आणि मला खरंच विश्वास होता की ठीक आहे, हे खरंच बदलणार आहे आणि क्रिकेट खूप मोठं होणार आहे, जसं अमेरिकेत अमेरिकन फुटबॉल किंवा युरोपमध्ये फुटबॉल आहे. त्यामुळे मी यात गुंतवणूक केली आणि हे निःसंशयपणे माझी सर्वोत्तम गुंतवणूक आहे." आज जय मेहता १००० ते २००० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीचे मालक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कर्जामुळे उद्ध्वस्त झाले होते जुही चावलाचे पती, आता 2000 कोटींचे मालक, IPL मधून उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य!