10 दिवसांनंतर नशीब बदलणार! 'या' राशींसाठी स्पेशल असणार प्रेमाचा महिना, मिळणार गुड न्यूज
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 2026 वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 2026 वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अनेक राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.
advertisement
2/7
विशेषतः कुंभ राशीत होणारी सूर्य, बुध आणि शुक्र यांची युती आणि शनीचा प्रभाव यामुळे 'लक्ष्मीनारायण राजयोग' आणि 'बुधादित्य राजयोग' सारखे शुभ योग निर्माण होत आहेत. जाणून घेऊया, या महिन्यात कोणत्या राशींना 'गुड न्यूज' मिळणार आहे.
advertisement
3/7
मेष: हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरेल. शनी आणि सूर्याच्या शुभ स्थितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. जुने अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. नोकरीत बढतीचे योग असून व्यवसायात मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तसेच या लोकांना त्यांच्या प्रेमाच्या नात्यात देखील सुख अनुभवता येईल.
advertisement
4/7
मिथुन: मिथुन राशीच्या जातकांसाठी बुधाचे गोचर भाग्योदय करणारे आहे. तुमच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर मोठा नफा होईल. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल आणि अविवाहितांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. जे कोणत्याही रिलेशन मध्ये आहेत त्यांना या महिन्यात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
तूळ: तूळ राशीच्या पाचव्या भावात होणारा लक्ष्मी योगाचा प्रभाव तुमच्यासाठी गेम-चेंजर ठरेल. स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकते. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल.
advertisement
6/7
धनु: धनु राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही उत्तमरीत्या पार पाडाल. नोकरी शोधणाऱ्यांना हवी तशी संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही एखादी मोठी मालमत्ता खरेदी करू शकता.
advertisement
7/7
कुंभ: तुमच्याच राशीत ग्रहांची युती होत असल्याने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. शनी आणि सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होईल. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील आणि रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
10 दिवसांनंतर नशीब बदलणार! 'या' राशींसाठी स्पेशल असणार प्रेमाचा महिना, मिळणार गुड न्यूज