TRENDING:

Mumbai: मुंबईतून मोठी बातमी, LPG सिलेंडर रेल्वे ट्रॅकवर उलटला, गॅस लिक झाल्याची भीती, घटनास्थळाचे PHOTOS

Last Updated:
चेंबुर येथील बी डी पाटील मार्ग इथं दुपारच्या सुमारासही ही घटना घडली आहे. सर्विस रोडवरून जात असताना एक एलपीजी सिलेंडर अचानक रस्त्यावर उलटला. (श्रीकृष्ण औटी, प्रतिनिधी)
advertisement
1/6
मुंबईतून मोठी बातमी, LPG सिलेंडर रेल्वे ट्रॅकवर उलटला, गॅस लिक झाल्याची भीती
मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूर परिसरात रेल्वे रुळाजवळ एक एलपीजी गॅसच्या टँकरचा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त टँकर रुळावर उलटला आहे. या गॅस गळती होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
advertisement
2/6
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबुर येथील बी डी पाटील मार्ग इथं दुपारच्या सुमारासही ही घटना घडली आहे. सर्विस रोडवरून जात असताना एक एलपीजी सिलेंडर अचानक रस्त्यावर उलटला.
advertisement
3/6
टँकर उलटल्यानंतर तो रेल्वेच्या रुळावर आला आहे. याच रुळावरून मालगाडीचा मार्ग आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
advertisement
4/6
स्थानिकांनी धाव घेऊन पाहणी केली असता गॅस लिक झाल्याचा वास येत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळापासून स्थानिकांना दूर राहण्यास सांगितलं आहे.
advertisement
5/6
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा टँकर नेमका कसा उलटला याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
6/6
ज्या रुळावर हा टँकर उलटला आहे, तो रेल्वेचा रूळ हा मालगाडी वाहतूक करणाऱ्या रेल्वेचा आहे. या अपघातामुळे वायू गळतीचा वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अग्निशमन दलाकडून टँकर हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai: मुंबईतून मोठी बातमी, LPG सिलेंडर रेल्वे ट्रॅकवर उलटला, गॅस लिक झाल्याची भीती, घटनास्थळाचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल