मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडोबा मैदान परिसरात राहणाऱ्या रुद्रवार कुटुंबाच्या घरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. वृंदा आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर खेळण्यासाठी गेली होती. घरात लावलेल्या झुल्यावर ती खेळत असताना अचानक तिचा तोल गेला.
बीड हादरलं! आईचा छळ पाहिला अन् 19 वर्षाच्या तरुणाचं डोकं फिरलं, मध्यरात्रीच बापाला...
advertisement
झोक्यावर चढताना किंवा उतरताना तिच्या गळ्याभोवती झोक्याची दोरी अडकली आणि त्यातूनच गळफास बसल्याचे समजते. त्याच वेळी तिच्या पायाखालील आधार निसटल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. काही क्षणांतच ही खेळाची वेळ दुर्दैवी अपघातात बदलली.
दरम्यान, बराच वेळ झाल्यानंतरही वृंदा खाली आली नाही, त्यामुळे तिच्या आईला संशय आला. ती वर पाहण्यासाठी गेली असता तिला मुलगी अडकलेल्या अवस्थेत दिसून आली. हे दृश्य पाहताच आईने हंबरडा फोडला. तिच्या आवाजाने घरातील इतर सदस्य वर धावले आणि त्यांनी तातडीने वृंदाला खाली उतरवून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे माजलगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील साध्या खेळण्यांमधूनही गंभीर अपघात घडू शकतात, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.






