कठोर वाटणाऱ्या जया बच्चन बाप्पासाठी आहेत हळव्या, पुण्यातील दगडूशेठ गणपतीशी खास कनेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jaya Bachchan Pune Dagdusheth Ganpati Connection : नेहमीच कठोर वाटणाऱ्या जया बच्चन गणपती बाप्पांसाठी खूप हळव्या आहेत. पुण्याच्या दगडूशेठ गणपतीशी त्यांचं खास कनेक्शन आहे.
advertisement
1/9

मुंबई असो किंवा पुणे सर्वत्रच गणेशोत्सवाची धुमधाम पाहायला मिळते. मुंबईत सिद्धिविनायक किंवा लालबागचा राजा प्रसिद्ध आहे तसा पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती प्रसिद्ध आहे.
advertisement
2/9

मुंबईप्रमाणेच पुण्यातील दगडूशेठ गणपतीलाही भाविकांची प्रचंड गर्दी असते. हा गणपती देखील नवसाला पावतो असं म्हणतात.
advertisement
3/9
अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हा बाप्पाच्या चरण नतमस्तक होतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीला सोन्याचे कान अर्पण केले होते. याची खूप चर्चा झाली होती. जया बच्चन यांची अशी कोणती इच्छा होती जी दगडूशेठ गणपतीनं पूर्ण केली!
advertisement
4/9
1982 मध्ये 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. पण मोठ्या प्रार्थना आणि इच्छाशक्तीनंतर अमिताभ बरे झाले. गंभीर अपघातातून अमिताभ बच्चन बरे झाले तेव्हा जया बच्चन थेट दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात पोहोचल्या होत्या.
advertisement
5/9
कुलीच्या अपघातानंतर अमिताभ बच्चन सुखरूप घरी परतले, तेव्हा जया बच्चन पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहोचल्या. त्यांनी देवाचे आभार मानले आणि सोन्याचे कानातले दागिने अर्पण केले होते.
advertisement
6/9
1982 मध्ये बंगळुरूमध्ये 'कुली' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. एका मारामारीच्या सीनमध्ये खलनायकाने अमिताभ बच्चन यांच्या पोटात जोरदार फाइट मारली. बिग बी स्टीलच्या टेबलावर आपटले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
advertisement
7/9
यानंतर तब्बल 72 तास ऑपरेशन होऊ शकले नाही. या काळात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. जवळपास 2 महिने ते रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या जीवासाठी जगभरातील चाहत्यांनी मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारात प्रार्थना केली.
advertisement
8/9
बिग घरी आल्यानंतर मुंबईत परतले तेव्हा रस्त्यांवर प्रचंड गर्दी जमली. शहरभर त्यांच्या पोस्टर्स लागले होते. घरी पोहोचल्यावर लोकांची अनियंत्रित गर्दी त्यांचे स्वागत करत होती. त्यांनी हात हलवून सर्वांचे आभार मानले.
advertisement
9/9
'कुली' चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यासाठी या खऱ्या घटनेचाच वापर करण्यात आला. बिग बी स्वतः या अपघाताला आपला दुसरा जन्म मानतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कठोर वाटणाऱ्या जया बच्चन बाप्पासाठी आहेत हळव्या, पुण्यातील दगडूशेठ गणपतीशी खास कनेक्शन