TRENDING:

'निळ्या ड्रममध्ये टाकून घेऊन जाईन', राखी सावंतचं जया बच्चनला थेट चॅलेंज, झालं काय?

Last Updated:
Jaya Bachchan Rakhi Sawant : जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापराझींबाबत केलेल्या वक्तव्याची देशभर चर्चा रंगली. आता राखी सावंतने जया बच्चन यांना थेड चॅलेंज दिलं आहे. पापराझींना काही बोललात तर निळ्या ड्रममध्ये भरून घेऊन जाईल, असं राखी जया बच्चन यांना म्हणाली आहे.
advertisement
1/7
'निळ्या ड्रममध्ये टाकून घेऊन जाईन', राखी सावंतचं जया बच्चनला थेट चॅलेंज
जया बच्चन काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पापराझींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'घाणेरडी टाईट पॅन्ट घालणारे उंदीर' असा पारराझींचा उल्लेख केला होता. त्यानंतर सर्व पापराझींनी एकत्रित येत बच्चन कुटुंबियांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/7
जया बच्चन यांच्या या वक्तव्याला काही बॉलिवूडकरांनी पाठिंबा दर्शवला असला तरी काहींना मात्र त्यांचं हे वक्तव्य पटलेलं नाही. दरम्यान राखी सावंत पापराझींना काही बोललात तर निळ्या ड्रममध्ये भरून घेऊन जाईल जया जी, असं म्हणाली आहे.
advertisement
3/7
बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' अर्थात राखी सावंत 14 डिसेंबर 2025 रोजी फरहाना भट्टच्या एका इव्हेंटमध्ये गेली होती. यावेळी निळा ड्रम घेत तिने रेड कार्पेटवर एन्ट्री केली. तिने स्वत:ला या निळ्या ड्रममध्ये लपवलं होतं.
advertisement
4/7
राखी सावंतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी ड्रममधून बाहेर येत ओरडतेय,"जया जी, माझ्या पापराझींना काहीही बोलू नका. नाहीतर तुम्हाला या ड्रममध्ये घेऊन जाईन".
advertisement
5/7
राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय,"मी जया बच्चन यांच्यासाठी हा निळा ड्रम आणला आहे. जया बच्चन यांना मी या ड्रमवर बसवते. माझ्या पॅप्सना काही म्हणायच्या आधी तुमचे कपडे नीट करा. मग माझ्या पॅप्सना सांगा. मला माझ्या पॅप्सचा अभिमान आहे. लव्ह यू".
advertisement
6/7
राखी सावंतने दरम्यान जया बच्चन यांना विनंतीही केली. राखी म्हणाली,"जया बच्चन तुमचा 'मिली' ही फिल्म रिलीज झाल्यापासून मी तुमच्यावर प्रेम करते. पण कृपया माझ्या पापराझींबद्दल आणि मीडियाबद्दल काहीही बोलू नका".
advertisement
7/7
राखी सावंतच्या व्हिडीओवर, शेवटी कोणीतरी बोललंच, वाह माझी धाडसी राखी, हिच्यातच धाडस आहे, राखी कोणालाही काहीही बोलू शकते, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'निळ्या ड्रममध्ये टाकून घेऊन जाईन', राखी सावंतचं जया बच्चनला थेट चॅलेंज, झालं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल