TRENDING:

रणवीर सिंहच्या 'कांतारा' मिमिक्रीवर ऋषभ शेट्टी भडकला, म्हणाला, 'लोक जेव्हा नक्कल करतात…'

Last Updated:
अभिनेता रणवीर सिंहने 'कांतारा' सिनेमातील दैव याची मिमिक्री केली चांगलीच व्हायरल झाली. रणवीरवर अनेकांनी टीका देखील केली. अखेर कांताराचा हिरो ऋषभ शेट्टी यानं याप्रकरणावर भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
रणवीरच्या 'कांतारा' मिमिक्रीवर ऋषभ शेट्टी भडकला, म्हणाला, 'लोक नक्कल करतात...'
कांतारा: चॅप्टर 1 हा सिनेमा 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे.  ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स ब्रेक करत प्रेक्षकांची मनं जिंकली. सिनेमाचं देशभरातून कौतुक झालं.
advertisement
2/7
अभिनेता रणवीर सिंहच्या एका स्टेज परफॉर्मन्समध्ये 'कांतारा'मधील दैव (दैवी पात्र) याची नक्कल आणि अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. रणवीरनं कांताराच्या दैवची केलेली नक्कल त्याला चांगलीच महागात पडली.
advertisement
3/7
या प्रकरणानंतर रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बायकॉट करण्याची मागणी केली होती. मात्र रणवीरनं योग्य वेळी सगळ्यांची माफी मागितली आणि संपूर्ण प्रकरण शांत झालं.
advertisement
4/7
दरम्यान कांताराचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं या प्रकरणावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई येथे झालेल्या Behindwoods इव्हेंटदरम्यान ऋषभ शेट्टीनं या प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, "अशा प्रकारचा सिनेमा बनवणं ही खूप मोठं रिस्क असतं. आपली संस्कृती आणि परंपरा पॉप कल्चरसारखी वाटू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते."
advertisement
5/7
ऋषभ शेट्टी यांनी सांगितलं की, हे पात्र साकारण्याआधी त्यांनी अनेक ज्येष्ठ व्यक्ती, अभ्यासक आणि जाणकार लोकांचा सल्ला घेतला होता. तो म्हणाला, "मी खूप आदर आणि श्रद्धेनं हा रोल साकारला आहे. फिल्म रिलीज झाल्यानंतर जेव्हा लोक स्टेजवर देवतेची नक्कल करतात तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटतं."
advertisement
6/7
ऋषभ शेट्टी पुढे म्हणाला, "मी जिथे जिथे जातो तिथे लोकांना विनंती करतो की हे स्टेज परफॉर्मन्स म्हणून करू नका. मी या भूमिकेशी भावनिकरित्या जोडलो गेलो आहे." यावेळी बोलताना ऋषभ शेट्टीनं रणवीर सिंहचं कुठेही नाव घेतलं नाही.
advertisement
7/7
कांताराच्या दैवची नक्कल केल्यानंतर रणवीर सिंहने सगळ्यांची माफी मागितली होती. त्याने लिहिलं होतं, "माझा हेतू फक्त ऋषभ शेट्टी यांच्या परफॉर्मन्सचं कौतुक करण्याचा होता. मी प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा आदर करतो. जर माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर सिंहच्या 'कांतारा' मिमिक्रीवर ऋषभ शेट्टी भडकला, म्हणाला, 'लोक जेव्हा नक्कल करतात…'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल