TRENDING:

'माझी बायको जळून मेली, आता भेटूया?', अभिनेत्रीच्या मागे लागला खतरनाक क्रिमिनल, दिली विचित्र ऑफर

Last Updated:
Indian TV Actress : अभिनेत्रीच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडलेत, जे ऐकून कुणाचाही थरकाप उडेल.
advertisement
1/10
'माझी बायको जळून मेली, आता भेटूया?', अभिनेत्रीच्या मागे लागला खतरनाक क्रिमिनल
मुंबई: टीव्हीवर आपण त्यांना अनेकदा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय. कधी प्रेमळ, कधी कणखर, कधी खलनायिका! पण पडद्यामागे अभिनेत्री जया भट्टाचार्य यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडलेत, जे ऐकून कुणाचाही थरकाप उडेल.
advertisement
2/10
अलीकडेच जया यांनी आपल्या आयुष्यातील एका अशा प्रसंगाचा धाडसीपणे खुलासा केला, जिथे एका विवाहित, खतरनाक व्यक्तीने त्यांच्याशी लग्न करण्यासाठी चक्क २ लाख रुपये मेहर देण्याची तयारी दाखवली होती. आणि याहून धक्कादायक म्हणजे, त्याच्या बायकोचा मृत्यू झाल्यावर त्याने जयाला फोन केलेला.
advertisement
3/10
जया भट्टाचार्य यांनी सिद्धार्थ कन्ननसोबतच्या मुलाखतीत हा भयानक अनुभव सांगितला. "लखनऊची गोष्ट आहे, मी तेव्हा १७-१८ वर्षांची होते, ११ वीत शिकत होते. आमच्या घरी एक 'काका' यायचे, त्यांनीच मला गाडी चालवायला शिकवली होती. ते नेहमी घरी यायचे, पण हळूहळू त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली की ते खूप खतरनाक आहेत, त्यांचे राजकीय संबंध आहेत आणि ते माफियाशीही जोडले गेले आहेत." जया यांनी पुढे सांगितलं, "एक दिवस त्या व्यक्तीने मला मुंबईला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण मी साफ नकार दिला."
advertisement
4/10
त्यानंतर जया जिथे कुठे जायची, तिथे तो व्यक्ती हजर असायचा. तिचा अक्षरशः पाठलाग करायचा! एक दिवस तर त्याने थेट जयाच्या पालकांना सांगितलं की, त्याला जयाशी लग्न करायचं आहे! "मी तेव्हा झोपलेली होते. हे ऐकून उठूनच बसले. मग वडिलांनी सांगितलं की तो माणूस तुझ्याशी लग्न करू इच्छितो. आम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती नव्हती."
advertisement
5/10
जयाने पुढे सांगितलं, "मग आम्ही दूरदर्शनच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथे त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं की तो माणूस विवाहित आहे आणि त्याला मुलंही आहेत." जयाने तेव्हा धाडस केलं, "मी त्याचा पत्ता घेतला आणि थेट त्याच्या घरी गेले. तिथे त्याच्या मुलांसोबत खेळले, त्यांच्या घरी जेवण केले आणि दिवसभर तिथेच फिरत राहिले. तो माणूस काही बोलू शकला नाही, तेव्हा कुठे त्याचं घरी येणं थांबलं."
advertisement
6/10
काही काळानंतर तो माणूस पुन्हा जयाच्या मागे लागला. "एक दिवस तो मला स्टेशनवर सोडायला आला, जे घरापासून जवळच होतं. मी त्याला विचारलं, 'तुम्हाला नेमकं काय हवं आहे?' तर तो म्हणाला, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. ही १९९१-९२ ची गोष्ट आहे, त्याने लग्नासाठी मला चक्क २ लाख रुपये देण्याची ऑफर दिली!" जयाने त्यावेळी त्याला परखडपणे सुनावलं, "मी विकायला नाहीये, आता तुम्ही इथून पुढे येणार नाही!"
advertisement
7/10
पण हा अनुभव इथेच संपला नाही. "नंतर मला कळलं की त्या माणसाने एका मुलीवर बलात्कार केला होता आणि त्याच्या बायकोनेच त्याला पोलिसांच्या हवाली केलं होतं. याहून भयानक गोष्ट म्हणजे, खूप वर्षानंतर त्या माणसाने पुन्हा मला फोन केला आणि म्हणाला, 'माझी बायको जळून मेलीये, आता भेटूया का?'" हे ऐकून जयाच्या अंगावर अक्षरशः काटा आला!
advertisement
8/10
जयाने मजाहिर रहीम यांच्यासोबतच्या आपल्या ११ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलही मोकळेपणाने सांगितलं. "ते खूप शिकलेले आणि प्रतिभावान होते, गोल्ड मेडलिस्ट होते. आमच्यात १९ वर्षांचा फरक होता. मला गमावून बसायचं नाही अशी त्यांना भीती वाटायची. मी त्यांची खूप आभारी आहे, ते नसते तर आयुष्यात मला किती मूर्ख भेटले असते माहीत नाही."
advertisement
9/10
जयाने स्वीकारलं की, "मी ११ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मग काही महिने त्यांच्यापासून दूर राहिले, तेव्हा मला वाटलं की मी एका पिंजऱ्यात होते." त्यांनी जयाला खूप प्रोटेक्ट करून ठेवलं होतं. "इंडस्ट्रीत तीन लोकांनी मला त्रास दिला होता, पण रहीमजींमुळे त्यांना ते करता आलं नाही."
advertisement
10/10
त्यांना लग्न करायचं होतं आणि मूलही हवं होतं, पण जयाला नाही. जया भट्टाचार्य आज ४७ वर्षांच्या असून त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. तिच्या आयुष्यात घडलेला हा धक्कादायक आणि थरारक प्रसंग, एका अभिनेत्रीने पाहिलेला भयावह अनुभव, अनेकांना विचार करायला लावणारा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझी बायको जळून मेली, आता भेटूया?', अभिनेत्रीच्या मागे लागला खतरनाक क्रिमिनल, दिली विचित्र ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल