TRENDING:

ऊरीमध्ये वडील शहीद झाले, आई विधवा महिलांसाठी करते काम, आता मुलगी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ

Last Updated:
सध्या ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा: चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीचा अभिनय सध्या खूप गाजत आहे.
advertisement
1/8
वडील शहीद झाले, आई विधवांसाठी करते काम, आता मुलीने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
मुंबई : सध्या ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा: चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिचा अभिनय सध्या खूप गाजत आहे. तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रुक्मिणीची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप प्रेरणादायी आहे, जी ऐकून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.
advertisement
2/8
'कांतारा: चॅप्टर १' मध्ये रुक्मिणीने नायिकेची भूमिका साकारली आहे, पण तिच्या भूमिकेला एक खास वळण आहे. ती पडद्यावरची मुख्य खलनायिका सुद्धा आहे. अभिनयाच्या बाबतीत तिने साकारलेली ही दुहेरी भूमिका पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले आहेत.
advertisement
3/8
माहितीनुसार, २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी निर्मात्यांनी जवळपास १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि आतापर्यंत जगभरात चित्रपटाने ३२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
advertisement
4/8
रुक्मिणी मूळची बेंगळूरूची आहे. ती कन्नड चित्रपटांमध्ये काम करते आणि तामिळ व तेलुगू चित्रपटसृष्टीतही तिने काम केले आहे. २०१९ मध्ये 'बीरबल' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
advertisement
5/8
पण तिची खरी ओळख तिच्या वडिलांमुळे आहे. रुक्मिणीचे वडील कर्नल वसंत वेणुगोपाल हे भारतीय लष्करातील अधिकारी होते. त्यांना 'अशोक चक्र' या भारताच्या सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
advertisement
6/8
२००७ साली जम्मू-काश्मीरमधील उरी येथे घुसखोरांशी लढताना ते शहीद झाले होते. आपल्या वडिलांचे देशप्रेम आणि शौर्य रुक्मिणीसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.
advertisement
7/8
रुक्मिणीची आई सुभाषिनी वसंत या स्वतः भरतनाट्यम नृत्यांगना आहेत आणि त्यांनी युद्धात विधवा झालेल्या महिलांना मदत करण्यासाठी कर्नाटकात एक संस्थाही सुरू केली आहे.
advertisement
8/8
रुक्मिणीने लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्समधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. लवकरच ती अभिनेता यशसोबत 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. अशा प्रेरणादायी पार्श्वभूमीतून आलेल्या रुक्मिणीचे यश खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऊरीमध्ये वडील शहीद झाले, आई विधवा महिलांसाठी करते काम, आता मुलगी बॉक्स ऑफिसवर घालतेय धुमाकूळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल