कार्तिक आर्यनने बिग बींना विचारला जया बच्चनबद्दलचा हा पर्सनल प्रश्न, ऐकून अमिताभ बच्चन शॉक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kaun Banega Crorepati 17 : 'कौन बनेगा करोडपती 17'च्या आगामी भागात अमिताभ बच्चन यांचा मजेदार अंदाज पाहायला मिळणार आहे. दरम्यान कार्तिक आर्यन बिग बींना एक पर्सनल प्रश्न विचारताना दिसून येत आहे.
advertisement
1/7

'कौन बनेगा करोडपती 17'चा आगामी भाग खूप मजेशीर असणार आहे. या आगामी भागात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे हजेरी लावणार आहेत. दोघेही आपल्या आगामी 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'च्या प्रमोशनसाठी KBC 17 मध्ये येणार आहेत.
advertisement
2/7
'कौन बनेगा करोडपती 17'च्या आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन अमिताभ बच्चन यांना वैयक्तिक आयुष्यासंबंधित एक पर्सनल प्रश्न विचारताना दिसत आहे.
advertisement
3/7
KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबद्दल प्रश्न विचारताना कार्तिक आर्यन दिसून आला. प्रोमोमध्ये कार्तिक आर्यन अमिताभ बच्चनला विचारतोय,"जया जी यांच्यापासून लपूनछपून तुम्ही काही खाता का?". अमिताभ बच्चन या प्रश्नाचं काहीही उत्तर न देतात हसत राहतात.
advertisement
4/7
कार्तिक आर्यन पुढे बिग बींना आणखी एक पर्सनल प्रश्न विचारतो. जया जी यांना तुमच्या फोनचा पासवर्ड ठाऊक आहे का?". या प्रश्नाचं हसत-हसत उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणतात,"वेडा आहेस का? मी सांगेन का त्यांना".
advertisement
5/7
अमिताभ बच्चन आणि कार्तिक आर्यन यांचा मजेदार अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. दोघांच्या वयात एक अंतर असूनही या संवादामध्ये त्यांच्यातील जनरेशन गॅप अजिबात जाणवत नाही.
advertisement
6/7
KBC 17 मध्ये अनन्या पांडेदेखील अमिताभ बच्चन यांनी नवीन गोष्टी शिकवताना दिसत आहे. OOTD, Drip, NO Cap सारख्या शब्दांचा अर्थ बिग बींना केबीसीच्या मंचावर समजावताना अनन्या दिसून येणार आहे.
advertisement
7/7
अनन्या पांडे पुढे बिग बी यांना Drip म्हणताना दिसून येत आहे. त्यानंतर बिग बी लगेचच म्हणतात,"Drip'चा अर्थ म्हणजे छतावरुन गळणारं पाणी. त्यानंतर सर्वत्र हशा पिकतो. अनन्या पुढे त्यांना समजावत म्हणतेय,"अमिताभ बच्चन जगातील एक महान व्यक्ती आहेत. नो कॅप. म्हणजे खरोखरंच महान".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कार्तिक आर्यनने बिग बींना विचारला जया बच्चनबद्दलचा हा पर्सनल प्रश्न, ऐकून अमिताभ बच्चन शॉक