Astrology: नवीन वर्षाच्या आधीच 29 डिसेंबरपासून दिवस आपलेच; या 6 राशींना चर्तुग्रही योगात सलग गुडन्यूज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Gochar 2025 Chaturgrahi Yoga Horoscope Predictions: ज्योतिषशास्त्रानुसार 29 डिसेंबर 2025 ला बुधाचं धनु राशीत संक्रमण होणार आहे. बुधानं धनु राशीत प्रवेश केल्यानं तिथं एक अद्भुत चतुर्ग्रही योग तयार होईल. धनु राशीत बुध, मंगळ, सूर्य आणि शुक्र यांची युती झाल्यामुळे हा चतुर्ग्रही योग तयार होईल. बुध धनु राशीत 17 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. बुधाच्या या संक्रमणाचा शुभ प्रभाव 6 राशींच्या लोकांच्या आयुष्यावर होणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात खूपच शानदार होणार आहे. उत्पन्नात चांगली वाढ होईल आणि येणाऱ्या काळात तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमचं कौटुंबिक जीवन सुखाचं राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये सुद्धा शुभ योग जुळून येत आहेत. करिअरमध्ये चांगले दिवस सुरू होतील.
advertisement
1/6

मेष रास - धनु राशीतील बुधाच्या संक्रमणामुळं मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती अनुभवता येईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उन्नतीचा आहे. तुम्हाला धार्मिक आणि वैयक्तिक कामांच्या संधी मिळतील. ज्या लोकांना परदेश प्रवासासाठी व्हिसा मिळवायचा आहे, त्यांनी या वेळेचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बुधाचं हे संक्रमण फायदेशीर ठरेल. तुमचे प्रेमसंबंध अधिक गोड होतील.
advertisement
2/6
मिथुन - बुधाचं हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानासारखं ठरेल. व्यवसायाच्या दृष्टीनं बुध तुम्हाला उत्तम लाभ मिळवून देईल. विवाहाशी संबंधित असलेल्या अडचणी सुटतील. मात्र, भागीदारीतील व्यवसायाबाबत थोडी काळजी घ्या. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि इतरांच्या भल्यासाठी काम कराल. जर तुमची एखादी कोर्ट केस चालू असेल, तर या काळात तिचा निकाल तुमच्या बाजूनं लागण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.
advertisement
3/6
सिंह - धनु राशीत बुध आल्यामुळं सिंह राशीच्या लोकांना मुलांशी संबंधित असलेल्या चिंता मिटतील. ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ खूपच अनुकूल आहे. बुध तुमची प्रसिद्धी आणि संपत्ती वाढवण्यास मदत करेल. कामाच्या ठिकाणी एखादी चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असलेल्या अडचणी दूर होतील. पदोन्नती आणि नवीन करार मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबासोबत धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. वैवाहिक आयुष्य सुखाचं राहील.
advertisement
4/6
वृश्चिक - बुधाच्या या संक्रमणामुळं वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनात थोडा ताण निर्माण होऊ शकतो, पण तुमची आर्थिक स्थिती मात्र खूप चांगली राहणार आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळं त्या दिशेनं केलेले प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे फायदा होईल. तुम्ही नवीन घर किंवा गाडी खरेदी करू शकता. नवीन कामांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. पती-पत्नीमधील संबंध अधिक मधुर होतील.
advertisement
5/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभाच्या स्थानी बुधाचं हे संक्रमण लकी आहे. मात्र, आपल्या मोठ्या भावांसोबत वाद घालणं टाळा, स्वभावातला उग्रपणा कमी ठेवा. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे; तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. घरात शुभ कार्य पार पडतील. शिक्षण आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासोबत प्रवासाला सुद्धा जाऊ शकता; सध्याची वेळ तुमच्यासाठी खूप चांगली आहे.
advertisement
6/6
मीन - बुधाचं हे संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक दृष्टीनं खूप फायदेशीर ठरेल. नवीन नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. राजकारणातील लोकांशी तुमचे संबंध अधिक सुधारतील. विशेषतः शस्त्र किंवा इतर मोठ्या उद्योगांशी संबंधित लोकांना मोठा लाभ होईल. तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचं सगळीकडं कौतुक होईल. घरातील वातावरण आनंदी आणि सुखद राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: नवीन वर्षाच्या आधीच 29 डिसेंबरपासून दिवस आपलेच; या 6 राशींना चर्तुग्रही योगात सलग गुडन्यूज