शेतामध्ये तण पटकन नष्ट व्हावे म्हणून तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र या तणनाशकांचा मातीवर विपरीत परिणाम होतो. तणनाशकांमुळे मातीतील उपयुक्त जिवाणू कमी होतात आणि मातीचा पोत हळूहळू खराब होत जातो. पाणी धरून ठेवण्याची ताकदही कमी होते. याचा फटका पुढील पिकांना बसतो. त्यामुळे तणनाशकांचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
Success Story : फक्त 25 गुंठ्यात केली शेती, शेतकऱ्याची आता लाखात कमाई, असं काय केलं?
काय काळजी घ्यावी?
गरजेपेक्षा जास्त फवारणी टाळावी, औषध मिसळताना अंदाज न घेता दिलेल्या प्रमाणातच वापर करावा. तणनाशक फवारल्यानंतर जमिनीची सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खत, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा वापर करावा. फवारणी करताना हातात ग्लोव्हज, तोंडाला मास्क लावावा. तणनाशकांचा जास्त वापर टाळून खुरपणी, शेणखत, सेंद्रिय खत असे पर्यायी उपाय केल्यास मातीचे आरोग्य टिकून राहते. योग्य वेळीच फवारणी करावी आणि शक्य असेल तर खुरपणीसारख्या पारंपरिक उपायांचा वापर करावा.





