Agriculture News : शेतकऱ्यांनो, आता शेतात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, दुप्पटीने वाढेल उत्पन्न
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
तणनाशकांच्या फवारणीमुळे मातीवर गंभीर परिणाम होत आहेत. मातीचा पोत दिवसेंदिवस खराब होत चालला आहे.
पुणे: गेल्या काही वर्षांपासून शेतामध्ये तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वेळात तण नष्ट होत असल्याने अनेक शेतकरी हा पर्याय निवडतात. मात्र या तणनाशकांच्या फवारणीमुळे मातीवर गंभीर परिणाम होत आहेत. मातीचा पोत दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. खुरपणीसाठी जास्त खर्च येतो, म्हणून शेतकरी तणनाशकांचा वापर करतात. पण यामुळे दीर्घकाळात शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तणनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, पाहुयात.
शेतामध्ये तण पटकन नष्ट व्हावे म्हणून तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र या तणनाशकांचा मातीवर विपरीत परिणाम होतो. तणनाशकांमुळे मातीतील उपयुक्त जिवाणू कमी होतात आणि मातीचा पोत हळूहळू खराब होत जातो. पाणी धरून ठेवण्याची ताकदही कमी होते. याचा फटका पुढील पिकांना बसतो. त्यामुळे तणनाशकांचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
काय काळजी घ्यावी?
view commentsगरजेपेक्षा जास्त फवारणी टाळावी, औषध मिसळताना अंदाज न घेता दिलेल्या प्रमाणातच वापर करावा. तणनाशक फवारल्यानंतर जमिनीची सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खत, कंपोस्ट आणि गांडूळ खताचा वापर करावा. फवारणी करताना हातात ग्लोव्हज, तोंडाला मास्क लावावा. तणनाशकांचा जास्त वापर टाळून खुरपणी, शेणखत, सेंद्रिय खत असे पर्यायी उपाय केल्यास मातीचे आरोग्य टिकून राहते. योग्य वेळीच फवारणी करावी आणि शक्य असेल तर खुरपणीसारख्या पारंपरिक उपायांचा वापर करावा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 18, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतकऱ्यांनो, आता शेतात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, दुप्पटीने वाढेल उत्पन्न










