Numerology: घराची एकहाती प्रगती करून दाखवतात या जन्मतारखांच्या मुली; आई-बापाचा अभिमान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: अंकशास्त्राच्या आधारे माणूस कसा आहे, याचा अंदाज येतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून आपण त्याचं व्यक्तिमत्त्व आणि भविष्याचा अंदाज घेऊ शकतो. एखाद्या घरात मुलीचा जन्म होतो, तेव्हा तिला लक्ष्मीचं रूप मानलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
या मुली फक्त नशीबवान नसून अत्यंत बुद्धिमानसुद्धा असतात. त्यांची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा सामान्य मुलांपेक्षा वेगळी आणि उत्कृष्ट असते. शिक्षण असो वा इतर कोणतंही क्षेत्र त्या आपल्या मेहनतीनं आणि हुशारीनं मोठं यश मिळवतात. या तारखांना जन्मलेल्या मुलींना आर्थिक समस्यांचा फारसा त्रास होत नाही. त्या आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असतात. त्यांच्याकडं नेहमी पैसा येत राहतो.
advertisement
advertisement
अशा मुलींच्या जन्मानंतर वडिलांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतात. त्यांना व्यवसायात किंवा नोकरीत मोठी प्रगती मिळते. वडिलांना पदोन्नती मिळणं, व्यापारात नफा होणं हे सर्व त्यांच्या मुलीच्या नशिबामुळं होतं असं मानलं जातं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









