advertisement

Knowledge : बाळ जन्मल्याबरोबर का रडतं? ते हसत का नाही? अनेकांना यामागचं खरं कारण माहितच नसेल

Last Updated:

एकीकडे ते बाळ जोरात रडत असतं आणि दुसरीकडे संपूर्ण कुटुंब आनंदाने साजरा करत असतं, हसत असतं असं का? ते बाळ का रडतंय? याबद्दल कोणी का विचार करत नाही?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : हॉस्पीटलमधील वेटिंग रूममध्ये बसलेल्या नातेवाईकांना जेव्हा बाळाच्या रडण्याचा तो पहिला आवाज ऐकू येतो, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. आई-वडिलांसाठी तो क्षण जगातील सर्वात आनंदाचा असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की निसर्गाचा हा नियम किती अजब आहे? एकीकडे ते बाळ जोरात रडत असतं आणि दुसरीकडे संपूर्ण कुटुंब आनंदाने साजरा करत असतं, हसत असतं असं का? ते बाळ का रडतंय? याबद्दल कोणी का विचार करत नाही?
खरंतर डिलिव्हरीच्या वेळी बाळ रडलं नाही तर ही कुटुंबियांसाठी दुखाची बातमी असते, कारण वैद्यकीय शास्त्रानुसार, बाळाचं ते पहिलं रडणं हे त्याच्या आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचं 'वरदान' असतं.
मग आता प्रश्न असा की बाळ जन्मल्यावर हसत का नाही? ते फक्त रडतच का असतं? डॉक्टर याला वरदान का मानतात? या प्रश्नांची उत्तरं आपल्या शरीराच्या गुंतागुंतीच्या रचनेत दडलेली आहेत.
advertisement
रडणं ही इमोशनल नाही, तर बायोलॉजिकल गरज आहे
बाळ जन्मल्यावर रडण्यामागे कोणतंही दुःख नसतं, तर ती एक जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली जैविक प्रक्रिया असते.
आईच्या गर्भात असताना बाळ नाळेद्वारे ऑक्सिजन घेत असतं. पण बाहेरच्या जगात आल्यावर त्याला स्वतःच्या फुफ्फुसांनी श्वास घ्यावा लागतो. जेव्हा बाळ जोरात रडतं, तेव्हा त्याच्या फुफ्फुसांमधील द्रव पदार्थ बाहेर निघतो आणि फुफ्फुसं पूर्णपणे विस्तारतात. यामुळे बाळ पहिल्यांदा नैसर्गिकरीत्या श्वास घेऊ शकतं.
advertisement
डॉक्टरांच्या मते, बाळ जितक्या जोरात रडतं, तितकं ते अधिक सुदृढ असल्याचं मानलं जातं. याचा अर्थ असा की बाळाची श्वसनसंस्था नीट काम करत आहे आणि त्याच्या शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचत आहे.
बाळ हसत का नाही?
बाळ जन्माला आल्यावर हसू किंवा स्मितहास्य का करू शकत नाही, याचं उत्तर त्याच्या मेंदूच्या विकासात आहे.
1. ब्रेनस्टेमचा ताबा: रडण्याची क्रिया मेंदूच्या ब्रेनस्टेम या भागातून नियंत्रित होते. हा मेंदूचा सर्वात प्राथमिक भाग आहे जो गर्भातच विकसित होतो.
advertisement
2. हसण्यासाठी हवं सोशल ब्रेन : हसणे किंवा स्मितहास्य करणे ही एक सामाजिक आणि भावनिक प्रतिक्रिया आहे. यासाठी मेंदूच्या वरच्या भागाचा विकास होणं गरजेचं असतं, जो जन्मानंतर हळूहळू विकसित होतो. म्हणूनच बाळाला पहिलं हसू उमटवायला साधारण 6 ते 8 आठवडे लागतात, तर मनसोक्त हसायला 3 ते 4 महिने वाट पाहावी लागते.
advertisement
रडणं हीच त्याची पहिली भाषा
जोपर्यंत बाळ बोलू शकत नाही किंवा खुणा करू शकत नाही, तोपर्यंत रडणं हीच त्याची एकमेव भाषा असते. भूक लागणे, अस्वस्थ वाटणे, वेदना होणे किंवा आईच्या स्पर्शाची गरज असणे, या सर्व गोष्टी बाळ रडूनच सांगतं. हे रडणं पालकांना हे समजण्यास मदत करतं की बाळाला नक्की काय हवं आहे.
advertisement
बाळाचं पहिलं रडणं ही निसर्गाची एक संरक्षणात्मक पद्धत आहे. त्या क्षणी बाळाच्या शरीराचं आणि मेंदूचं पूर्ण लक्ष केवळ जिवंत राहण्यावर असतं, आनंद व्यक्त करण्यावर नाही. आनंद, हसू आणि खेळणं हे सर्व नंतर येतं, जेव्हा बाळ स्वतःला या जगात सुरक्षित समजू लागतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Knowledge : बाळ जन्मल्याबरोबर का रडतं? ते हसत का नाही? अनेकांना यामागचं खरं कारण माहितच नसेल
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement