Shubhman Gill : गिल खरंच दुखापतीमुळे टीममधून बाहेर झाला? त्या एका Photo ने सस्पेन्स वाढला!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाला धक्का बसला आहे. सीरिजमधून टीम इंडियाचा उपकर्णधार गिल सीरिजमधून बाहेर झाला आहे.
1/8
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. दाट धुक्यामुळे सीरिजचा चौथा सामना रद्द करण्यात आला. ही मॅच झाली नाही तर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ओपनर शुभमन गिल सीरिजमधून बाहेर झाला आहे.

advertisement
2/8
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिलला सराव करत असताना पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

3/8
टीममधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौथ्या टी-20 सामन्याच्या आदल्यादिवशी गिल बराच वेळ नेटमध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करत होता, पण प्रॅक्टिसच्या शेवटी गिलच्या पायाच्या अंगठ्याला एक बॉल  लागला, त्यानंतर गिलला तीव्र वेदना व्हायला लागल्या आणि तो लंगडतच ड्रेसिंग रूममध्ये गेला.

4/8
गिल मागच्या काही काळापासून टी-20 फॉरमॅटमध्ये संघर्ष करत आहे. मागच्या 18 टी-20 सामन्यांमध्ये गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही, त्यामुळे त्याला टीममधून बाहेर करण्याची मागणीही सुरू आहे.

5/8
बीसीसीआयने चौथ्या टी-20 सामन्याच्या आधी टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसचे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये गिल सराव करताना दिसत आहे. गिलला खरंच दुखापत झाली आहे? का खराब फॉर्ममुळे त्याला टीममधून बाहेर केलं आहे? याबाबतचा सस्पेन्स मात्र या फोटोंमुळे वाढला आहे.

6/8
गिलच्या दुखापतीचं गांभिर्य लक्षात घेता टीम मॅनेजमेंटने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. गिलला लवकर फिट करण्यासाठी खबरदारीचे सगळे उपाय घेतले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उरलेल्या सामन्यात गिलच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.

7/8
जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणारी 5 टी-20 मॅचची सीरिज टी-20 वर्ल्ड कपआधीची शेवटची आहे. टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे बीसीसीआयला 7 जानेवारीला 15 सदस्यीय टीमची निवड करावी लागणार आहे. 7 जानेवारीपर्यंत गिल फिट झाला नाही, तर त्याची न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज आणि  टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड व्हायची शक्यता कमी आहे.

8/8
दुसरीकडे टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलही आजारी असल्यामुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे. धर्मशालामधल्या तिसऱ्या टी-20 आधी अक्षर पटेल आजारी पडला, यानंतर त्याच्याऐवजी शाहबाज अहमदची टीममध्ये निवड झाली.

Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement