Tanya Mittal Home Tour: किचनमधली लिफ्ट, 2500 sq ft ची कपड्यांची आलिशान खोली! फेक म्हणणाऱ्यांना तान्या मित्तलचं सणसणीत उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tanya Mittal Home Tour: आता तान्याने चक्क आपल्या घराचा 'होम टूर' व्हिडिओ शेअर केला आहे. एका न्यूड पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने कॅमेरासमोर ती लिफ्ट दाखवली आहे.
advertisement
advertisement
तान्या मित्तलने शोमध्ये एका गोष्टीचा वारंवार उल्लेख केला होता, तो म्हणजे तिच्या किचनमधील लिफ्ट. तिने सांगितलं होतं की, "आमच्या किचनमध्ये एक लिफ्ट आहे. खाली जेवण तयार झालं की ते लिफ्टमध्ये ठेवलं जातं आणि वरच्या मजल्यावरील किचनमध्ये ते आपोआप पोहोचतं." तेव्हा सर्वांना हे 'आठवं आश्चर्य' वाटलं होतं आणि अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं.
advertisement
पण आता तान्याने चक्क आपल्या घराचा 'होम टूर' व्हिडिओ शेअर केला आहे. एका न्यूड पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने कॅमेरासमोर ती लिफ्ट दाखवली आहे. जेव्हा अँकरने आश्चर्याने विचारलं की हे काय आहे? तेव्हा तान्या हसत म्हणाली, "हीच ती किचन लिफ्ट आहे, ज्यावरून लोकांनी मला ट्रोल केलं होतं." तिने हसत हसत या लिफ्टला तिचं 'आठवं आश्चर्य' म्हटलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मात्र, आता एकामागून एक येणारे हे व्हिडिओ पाहता, तान्या फक्त हवेत गप्पा मारत नव्हती, तर ती खरोखरच एका मोठ्या साम्राज्याची मालकीण आहे, हे सिद्ध होत आहे. थोडक्यात काय, तर बिग बॉसच्या घरात ज्या गोष्टींना सर्वांनी नॉनसेन्स म्हटलं, त्या गोष्टी आज सत्यात पाहून ट्रोलर्सना आता तोंड लपवायला जागा उरलेली नाही.









