बॅडमिंटन खेळताना आली आठवली, रॅकेट फेकलं अन् थेट कविताचं घर गाठलं; 'रेहमान'च्या वडिलांची रोमँटिक Love Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bollywood Unheard Story : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, प्रेम कोणत्याही वयात होतं असं म्हणतात. एका प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टारसोबतही असंच घडलं. बॅडमिंटन खेळत असताना त्याला अचानक त्याच्या प्रेयसी आठवली आणि तो थेट धावत तिच्या घरी पोहोचला. 16 वर्षांनी लहान असलेल्या तिला थेट लग्नाची मागणी घातली. दोघांचं लग्न खूप चर्चेत आलं होतं.
आपण बोलतोय तो अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. पाकिस्तानातील पेशावर येथे जन्मलेल्या विनोद खन्ना यांना सुनील दत्त यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली होती. ते एका अतिशय सामान्य कुटुंबातून आले होते. विनोद खन्ना यांनी सुरुवातीला खलनायकाच्या भूमिका केल्या. 'मेरे अपने' या चित्रपटातून त्यांची लोकप्रियता मिळाली आणि अभिनेता होण्याची संधी मिळाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विनोद खन्ना भारतात परतले तेव्हा त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांची पत्नी गीतांजली यांनी त्यांना घटस्फोट दिला. विनोद खन्ना यांनी स्वत:ला सावरलं आणि 1987 मध्ये त्यांनी इंसाफ सिनेमातून कमबॅक केलं. एक संसार मोडल्यानंतर ते एकटे पडले होते. तेव्हाच त्यांच्या आयुष्यात कविता दफ्तरी यांची एन्ट्री झाली. 1988 साली कविता आणि विनोद खन्ना यांची एका पार्टीमध्ये भेट झाली.
advertisement
कविता विनोद खन्नांपेक्षा 16 वर्षांनी लहान होत्या. विनोद खन्ना पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडले. मित्रांच्या मदतीने त्यांनी तिचा फोन नंबर मिळवला. दोघे फोनवर बोलू लागले. एके दिवशी विनोद खन्ना बॅडमिंटन खेळत होते. त्यांना अचानक कविताची आठवण आली आणि घामानं चिंब झालेले विनोद खन्ना धावत धावत थेट तिच्या घरी पोहोचले. त्यांनी कविताला प्रपोज केलं आणि लग्नाची मागणी घातली. कवितानं देखील लगेचच त्यांना होकार दिला.
advertisement










