गावाच्या चौकात येऊन तरुणाचे टोकाचे पाऊल, धाराशिव हादरले, उलट सुलट चर्चांना उधाण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कळंब तालुक्यातील इटकूर गावात आज सकाळी काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये धक्कादायक घटना घडली असून एका तरुणाने भर चौकात गळफास घेत आयुष्याला पूर्णविराम दिला. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
कळंब तालुक्यातील इटकूर गावात आज सकाळी काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. श्रीकांत लिंबराज गंभीरे (वय 36) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. इटकूर गावातील बाजार मैदानात श्रीकांतने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवले.
ही घटना गुरूवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
या घटनेमुळे संपूर्ण गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कौटुंबिक तणावातून की कर्जबाजारीपणामुळे श्रीकांत गंभीरे यांनी टोकाचे पाऊल उचलले. यासंदर्भातील तपास पोलीस करीत आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
December 18, 2025 3:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावाच्या चौकात येऊन तरुणाचे टोकाचे पाऊल, धाराशिव हादरले, उलट सुलट चर्चांना उधाण










