Kranti Redkar : 'बेबी नंबर 1 , बेबी नंबर 2...' पहिल्या सोनोग्राफीवेळी हलली होती क्रांती रेडकरच्या पायाखालची जमीन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
क्रांती रेडकरने दोन जुळ्या मुलींची आई आहे. जुळी बाळं होणार ही बातमी समजल्यावर क्रांतीच्या पायाखालची जमीन हलली होती. नेमकं काय झालं हे क्रांतीने पहिल्यांदाच सांगितलं.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. क्रांतीनं तिच्या अभिनय कारकीर्दीत अनेक यशस्वी सिनेमात काम केलं आहे. आजही तिचे सिनेमे प्रेक्षक आवडीनं पाहतात. मालिका, नाटक आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये क्रांतीनं आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
advertisement
advertisement
advertisement
लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना क्रांतीने तिच्या पहिल्या सोनोग्राफीचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, "मी पहिल्या सोनोग्राफीला गेले तेव्हा मला एवढंच माहिती होतं की मी प्रेग्नंट आहे. डॉक्टर पोटावर यंत्र फिरवत होत्या आणि टीव्हीमध्ये बघत होत्या. मी त्यांच्याकडे बघत होते. त्यांनी मला सांगितलं, हे बघ सगळं काही ठीक दिसत आहे. तुला दिसतंय, बेबी नंबर 1 इथे आहे आणि बेबी नंबर 2 इथे आहे. दोन्ही ठीक आहेत."
advertisement
advertisement
क्रांती पुढे म्हणाली, "माझ्या पायाखालची जमीन हलली होती. मी एका गोष्टीसाठी खुश होते की, माझ्या आयुष्यात मुलं ही माझ्या वयाच्या टप्प्यावर खूप उशिरा आली. माझं सगळं करिअर झाल्यावर आता लग्न करूया, मुलं करूया. ट्विन्स होणार कळल्यावर माझं असं झालं की, चला आता एका फटक्यात काम झालं. पुन्हा प्रेग्नंट राहायला नको, त्यामुळे मी खूप खुश होते."
advertisement







