वसई रोड स्थानकावर मुंबईसारख्या रेल्वे स्टेशनची सुविधा, प्रवाशांची दगदग होणार कमी

Last Updated:

Vasai Road Station : वसई रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी नवीन एलिवेटेड डेक सुरू झाला आहे.हा डेक गर्दी कमी करण्यास मदत करेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक बनेल.

News18
News18
वसई : वसई रोड रेल्वे स्थानकावर मुंबईसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन एलिवेटेड डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होणार असून एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर जाणे सोपे होईल. त्यामुळे रोजच्या प्रवाशांची दगदग मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
वसई रोड स्थानकावरी प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक
वसई रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वर नवीन एलिवेटेड डेक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहे. हा डेक मुंबई रेल्वे विकास महामंडळाने बांधला असून त्याची लांबी 60 मीटर आणि रुंदी 10 मीटर आहे. नवीन डेकमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित,सोपा आणि आरामदायक होईल.
advertisement
दररोज हजारो प्रवासी वसई रोड स्थानकावरून ये-जा करतात, त्यामुळे गर्दी खूप वाढते. या नवीन डेकमुळे प्लॅटफॉर्मवर होणारी ताण कमी होईल आणि प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर जाणे अधिक सोपे होईल. डेकवर 3 मीटर रुंदीच्या जिन्यांची सोय आहे, ज्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची हालचाल सुरळीत होईल.
याशिवाय हा डेक गर्दी व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर नेहमीच्या तुलनेत कमी वेळेत पोहचता येईल, त्यामुळे उशिरा येणाऱ्या किंवा धावपळीने प्रवास करणाऱ्या लोकांना खूप मदत होईल. स्थानकाची सुरक्षितता वाढेल आणि सर्व प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होईल.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
वसई रोड स्थानकावर मुंबईसारख्या रेल्वे स्टेशनची सुविधा, प्रवाशांची दगदग होणार कमी
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement