फॅनने जोरात मारली हाक, पण रिंकू राजगुरूने केलं इग्नोर, ती असं का वागली?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरू अभिनीत 'आशा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आर्ची म्हणून हाक मारताच रिंकू राजगुरू चाहतीला इग्नोर करताना दिसून आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रिंकू 'आशा' हे पात्र साकरल्याबद्दलचा एक किस्सा एबीपीसोबत शेअर करत सांगते,"आशा या चित्रपटाबद्दल रिलीजआधीपासूनच आम्हाला खूप छान कमेंट्स येत आहेत.'सैराट'नंतर मला आर्ची ताई या एकाच आवाजाची सवय होती. मागे नागपुरला गेले असताना कोणीतही मला आशा ताई म्हणून पहिल्यांदा आवाज दिला आणि सुरुवातीला मला कळलं नाही आणि मी त्या आवाजाकडे दुर्लुक्ष केलं. नंतर त्या मला म्हणाल्या,"आम्ही तुमचा टीझर पाहिला बरं का? आम्ही फिल्म पण पाहायला जाणार आहोत.
advertisement
रिंकू पुढे म्हणाली,"पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान मला मालतीचा डायलॉग म्हणायला लावला. त्यामुळे मला वाटतं आशा ताई लोकांना जवळची वाटत आहे. त्या सगळ्यांना आपल्याशा वाटत आहेत आणि आता ही भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. दिग्दर्शकाने सांगितलं तसं काम मी करत गेले आहे. त्यामुळे लोकांना मी मी साकारलेली आशा ताई नक्कीच आपलीशी वाटेल.
advertisement
महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास रिंकू राजगुरूच्या ‘आशा’मधून उलगडला जाणार आहे. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम चित्रपटात दिसणार आहे. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.









