Khed: वळणावर घात झाला, भरधाव लालपरी समोरून आली अन् दुचाकीस्वार चाकाखाली सापडला, खेडमधील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
एसटी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. खेड–मंडणगड मार्गावर भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड–मंडणगड मार्गावर भिलारे–आयनी गावानजीक हा अपघात गुरुवार, दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. एसटी बस आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आयनी चव्हाण वाडी येथील दुचाकीस्वार विलास कोरपं यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
विलास कोरपे हे खेड येथून आयनीकडे आपल्या दुचाकीवर जात होते. त्याच वेळी मंडणगडहून खेडकडे येणाऱ्या एसटी बसशी त्यांची समोरासमोर धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, विलास कोरपे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बाईकचाही चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पुढील तपास पोलीस यंत्रणांकडून सुरू आहे.
advertisement
तळेगाव-चाकण मार्गावर रिक्षा उलटली, ३ जणांचा मृत्यू
view commentsदरम्यान, पुण्यातील तळेगाव–चाकण मार्गावर महाळुंगे पोलीस स्टेशनजवळ प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. प्रवासी रिक्षातून १२ जण प्रवास करत असताना रिक्षा पलटी होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रवासी हे कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, प्रवासी रिक्षातून सुरू असलेल्या वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या घटनेनंतर केला जात आहे.
Location :
Khed,Ratnagiri,Maharashtra
First Published :
December 18, 2025 5:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Khed: वळणावर घात झाला, भरधाव लालपरी समोरून आली अन् दुचाकीस्वार चाकाखाली सापडला, खेडमधील घटना







