Manikrao Kokate Resigns: अखेर माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा, अजितदादांकडून घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आल्यानंतर आधी त्यांच्याकडून खाती काढून घेतली. राज्य सरकार कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नसल्याचे संकेत मिळताच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत आता कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे कळते. अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. तसेच कोकाटे यांच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत करतील, असे सांगण्यात येते. कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याने पोलिसांसमोर वैद्यकीय अडचण मात्र कायम आहे.
माणिकराव कोकाटे यांचे राजीनामा, अजित पवार यांची एक्स पोस्ट
advertisement
माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे.
advertisement
सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असे अजित पवार म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manikrao Kokate Resigns: अखेर माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा, अजितदादांकडून घोषणा










