9820 किमी, 43 दिवस आणि 3 पुणेकर मित्र; दुचाकीवरून गाठलं पुणे टू अरुणाचल प्रदेश!
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शिवणे येथील तीन तरुणांनी दुचाकीवरून तब्बल 9 हजार 820 किलोमीटरचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे.
पुणे : साहस, जिद्द आणि भारताच्या विविधतेचा अनुभव घेण्याची प्रबळ इच्छा मनाशी बाळगून पुणे जिल्ह्यातील शिवणे येथील तीन तरुणांनी दुचाकीवरून तब्बल 9 हजार 820 किलोमीटरचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे. संदीप देशमुख, संतोष पाषाणकर आणि रवींद्र पवार या तिघांनी मिळून पुणे ते उत्तर-पूर्व भारतातील आठ राज्यांमधून हा थरारक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करत 43 दिवसांनंतर सुखरूप पुण्यात परत येत आपली साहसगाथा पूर्ण केली. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना त्यांनी दिली.
रवींद्र पवार, संदीप देशमुख आणि संतोष पाषाणकर यांनी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यातून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन प्रवासास सुरुवात केली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान डोंगराळ रस्ते, तीव्र वळणे, मुसळधार पाऊस, दाट धुके आणि दुर्गम भागातील अतिशय खराब रस्ते अशा आव्हानांचा सामना करत या तिन्ही तरुणांनी हा प्रवास दुचाकीवरून पूर्ण केला.
advertisement
यावेळी तिन्ही तरुणांनी सांगितले की, भारतातील विविध राज्यातील स्थानिक संस्कृती, खाद्यपरंपरा, सण उत्सव अनुभव घेण्यासाठी हा प्रवास करण्याचा आम्ही निर्णय घेतला. विविध राज्यांची संस्कृती आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहताना भारत देश किती विविधतेने नटलेला आहे, याचे दर्शन झाले.
advertisement
या प्रवासात त्यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीम अशा दुर्गम आणि निसर्गरम्य राज्यांचा समावेश असलेला प्रदीर्घ मार्ग पार केला. डोंगराळ रस्ते, तीव्र वळणे, सतत बदलणारे हवामान, मुसळधार पाऊस, दाट धुके आणि काही ठिकाणी अतिशय खराब रस्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत या तिन्ही तरुणांनी हा प्रवास पूर्ण केला.
advertisement
तब्बल 43 दिवसांचा 9 हजार 820 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तिघेही 5 नोव्हेंबर रोजी पुण्यात दाखल झाले. हा प्रवास त्यांचा आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरला असून, भविष्यात आणखी अशी साहसी मोहीम राबवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 6:55 PM IST








