पूर्वजांच्या फोटोची योग्य दिशा - वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचा फोटो नैऋत्य म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावणं खूप शुभ आणि सकारात्मक मानलं जातं. फोटो अशा पद्धतीनं असावा की, जो कोणी तो फोटो पाहत असेल त्याचं तोंड दक्षिण दिशेकडं राहील. दक्षिण दिशा ही यम आणि पितृलोकाशी संबंधित मानली जाते, म्हणून इथं पूर्वजांचा फोटो लावणं चांगलं असतं. फोटो लावताना नेहमी दिशेची खास काळजी घेतली पाहिजे.
advertisement
फोटो लावण्याशी संबंधित महत्त्वाचे नियम - पूर्वजांचा फोटो नेहमी बैठकीच्या खोलीत किंवा पूजेच्या जागेच्या बाहेर लावावा, पण तो देव्हाऱ्यात कधीही लावू नये. फोटो फ्रेममध्ये स्वच्छ असावा, फाटलेला किंवा धुरकट फोटो लावू नका. फोटोमध्ये पूर्वजांचे भाव शांत आणि प्रसन्न असावेत. बेडरूम, स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावू नका. फोटो खूप खाली किंवा खूप उंचावर लावू नका, डोळ्यांच्या रेषेत लावणं उत्तम मानलं जातं.
घरात चुकीच्या दिशेला टॉयलेट बांधलं गेलं होतं! वेळीच केलेला हा उपाय कामी आला
चुकीच्या दिशेला फोटो लावण्याचे तोटे -
वास्तुशास्त्रानुसार, उत्तर किंवा ईशान्य दिशेला पूर्वजांचा फोटो लावल्यानं मानसिक ताण, कौटुंबिक वाद आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. चुकीच्या दिशेला फोटो लावल्यानं घरात नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा प्रवेश होऊ लागतो.
वास्तुशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात पूर्वजांचा फोटो लावू नये, असं करणं खूप अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे देवी-देवता नाराज होतात. खरं तर, पूर्वज आणि पितरांचं स्थान देवाच्या खाली मानलं गेलं आहे, त्यामुळं देव्हाऱ्यात कधीही पितरांचा फोटो लावू नये.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
