नाटक झालं हाऊसफुल्ल! आता रिअल लाइफ कपल मोठा पडदा गाजवणार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी इंडस्ट्रीतील हे रिअल लाइफ सेलिब्रेटी कपलच्या नाटकाला सध्या हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. हे रिअल लाइफ कपल आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र झळकणार आहेत.
advertisement
1/7

'आमने सामने', 'इवलेसे रोप', 'तू अभीतक है हसीन' यांसारकाही नाटके, मालिका आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी हिट जोडी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
2/7
ही जोडी म्हणजे अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम. रंगभूमीवर एकमेकांना पूरक ठरणारी ही जोडी प्रेक्षकांसाठी आता एक सरप्राईज घेऊन येत आहे.
advertisement
3/7
'मना'चे श्लोक' या चित्रपटातून लीना भागवत, मंगेश कदम ही हिट जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
4/7
प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेले मंगेश आणि लीना आता रुपेरी पडद्यावरही एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांची भन्नाट ऑन-स्क्रीन केमिस्ट्री व कमाल टाईमिंग नेहमीच अप्रतिम असल्याने 'मना'चे श्लोक' मध्ये त्यांची केमिस्ट्री पाहाणे देखील प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.
advertisement
5/7
अभिनेत्री लीना भागवत म्हणाली, "आम्ही पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणं ही नवी आणि सुंदर अनुभूती आहे. मला खात्री आहे प्रेक्षक आम्हाला मोठ्या पडद्यावरही तेवढंच प्रेम देतील."
advertisement
6/7
अभिनेते मंगेश कदम म्हणाले, "नाटक आणि चित्रपटाचा अनुभव वेगळा असतो. मात्र लीनासोबत स्क्रीन शेअर करणं हे नेहमीच मजेशीर आणि समाधानकारक असतं. आमची जोडी एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे."
advertisement
7/7
'मना'चे श्लोक' हा सिनेमा 10 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमांत मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.