Mangalsutra : निक जोनसचं तर हातातच, पण या मराठी अभिनेत्याने चक्क गळ्यात घातलं बायकोच्या नावाचं 'मंगळसूत्र'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Nick Jonas Prasad Jawade Mangalsutra : प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनसच्या हातातील मंगळसूत्र पाहून सगळ्यांना कौतुक वाटलं आहे. त्याच्याआधी काही वर्षांपूर्वीच एका मराठी अभिनेत्याने आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
advertisement
1/5

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्या. त्या व्हिडीओमध्ये त्याने हातात घातलेलं मंगळसूत्र ब्रेसलेट दिसलं. यानंतर त्याच्या हातातील मंगळसूत्राची चर्चा होऊ लागली.
advertisement
2/5
निक जोनसने त्याच्या हातात प्रियांका चोप्राच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे एक मराठी अभिनेता ज्याने चक्क त्याच्या गळ्यातच बायकोच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहे.
advertisement
3/5
मंगळसूत्र म्हणजे महिलांचा दागिना. पत्नीने आपल्या पतीच्या नावाने घालायचं, असंच आजवर मानलं गेलं. पण निक जोनससह या मराठी अभिनेत्याने मात्र एक पाऊल उचललं आणि पत्नीप्रमाणे स्वत:ही मंगळसूत्र घातलं.
advertisement
4/5
हा मराठी अभिनेता आहे प्रसाद जवादे. ज्याचं 18 नोव्हेंबर 2023 रोजी अभिनेत्री अमृता देशमुखसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हा प्रसादने फक्त अमृताच्याच गळ्यात नाही तर आपल्या गळ्यातही तिच्या नावाचं मंगळसूत्र घातलं.
advertisement
5/5
प्रसाद जवादेचं मंगळसूत्र हे पारंपारिक नाही तर थोडं हटके, मॉडर्न होतं. म्हणजे एक चैन आणि त्यात अमृताच्या नावाचं पेंडंट होतं. लग्नात त्याने स्वत: आपल्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं आणि अभिमानाने दाखवलंसुद्धा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mangalsutra : निक जोनसचं तर हातातच, पण या मराठी अभिनेत्याने चक्क गळ्यात घातलं बायकोच्या नावाचं 'मंगळसूत्र'