सुरज चव्हाणचं लग्न ठरलं, आता घर कधी पूर्ण होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली मोठी अपडेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Suraj Chavan New House Update : ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गरीब कुटुंबातून आलेल्या आणि गुणवान असलेल्या सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं.
advertisement
1/8

‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आणि ‘गुलीगत किंग’ म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण याच्या आयुष्यात लवकरच एक मोठा आणि आनंदाचा टप्पा येणार आहे.
advertisement
2/8
नुकतीच त्याची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने सूरजचं लग्न ठरल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
advertisement
3/8
काही दिवसांपूर्वीच अंकिता वालावलकर सूरजला भेटायला थेट त्याच्या गावी पोहोचली होती. लग्नाची तारीख जवळ आली असून तिला लग्नाला उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळे तिने आधीच जाऊन आपल्या लाडक्या भावाला म्हणजेच सूरजला भेटून शुभेच्छा दिल्या.
advertisement
4/8
या भेटीदरम्यान अंकिताने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली. तिने आपल्या भावाचं नवीन घर पाहिलं, जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाने पूर्णत्वास येत आहे.
advertisement
5/8
‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गरीब कुटुंबातून आलेल्या आणि गुणवान असलेल्या सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. त्यानुसार घराचं भूमिपूजन पार पडलं आणि पवारांनी स्वतः या घराच्या बांधकामाची पाहणीही केली होती.
advertisement
6/8
नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनीही सूरजच्या घराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज चव्हाण, त्याच्या अंगी कलागुण आहेत, म्हणून तो इतक्या उंचीवर पोहोचला. ‘बिग बॉस’मुळे तो महाराष्ट्राला आणि देशाला माहीत झाला. त्याचं घर बांधून देण्याचा मनात विचार आला होता आणि आता ते अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचं घर पूर्ण होईल. सगळ्यांचं चांगलं व्हावं, हीच आमच्यासारख्यांची भावना आहे.”
advertisement
7/8
सूरज चव्हाण स्वतः त्याच्या या स्वप्नपूर्तीबद्दल खूप आनंदी आहे. त्याने अजित पवारांचे आभार मानले आणि एका गरीब मुलाला मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
advertisement
8/8
सध्या घराचं पायऱ्यांचं आणि फिनिशिंगचं काम सुरू आहे. हे ड्रीम होम पूर्ण होताच, सूरज आपल्या नव्या नवरीचं या घरात धुमधडाक्यात स्वागत करणार आहे. आता सूरज लग्न कधी करणार आणि या आलिशान घरात गृहप्रवेश कधी करणार, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुरज चव्हाणचं लग्न ठरलं, आता घर कधी पूर्ण होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली मोठी अपडेट