TRENDING:

वारंवार कोळ्याची जाळी होतेय? फक्त 'या' 2 गोष्टी फवारा, घरातून कायमचा होईल कोळ्यांचा सफाया!

Last Updated:
सणासुदीच्या काळात घर स्वच्छ करणे हे एक मोठे आव्हान असते. स्वच्छ घर केवळ सुंदर दिसत नाही, तर पाहुण्यांनाही आकर्षित करते. मात्र, साफसफाई करूनही...
advertisement
1/7
वारंवार कोळ्याची जाळी होतेय? फक्त 'या' 2 गोष्टी फवारा, घरातून कायमचा होईल सफाया
सणासुदीच्या काळात घर स्वच्छ करणे हे एक मोठे आव्हान असते. स्वच्छ घर केवळ सुंदर दिसत नाही, तर पाहुण्यांनाही आकर्षित करते. मात्र, साफसफाई करूनही अनेकदा कोळ्याची जाळी (spider webs) पुन्हा दिसू लागते आणि घरात एक नकारात्मक वातावरण तयार होते.
advertisement
2/7
कोळ्यांना दूर ठेवण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उत्पादने उपलब्ध असली तरी, ती आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे, काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कोळ्यांना दूर ठेवू शकता आणि जाळ्यांच्या समस्येपासून सहज मुक्ती मिळवू शकता.
advertisement
3/7
पेपरमिंट तेल (Peppermint Oil) : कोळ्यांना दूर ठेवण्यासाठी पेपरमिंट तेल एक उत्कृष्ट उपाय आहे, कारण त्याच्या तीव्र वासामुळे कोळी पळून जातात. 8-10 थेंब पेपरमिंट तेल 1 कप पाण्यात मिसळा आणि ते मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून कोपऱ्यात फवारा. कोळ्यांना दूर ठेवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.
advertisement
4/7
लवंग आणि कापूर : घरातून कोळ्याची जाळी काढण्यासाठी लवंग आणि कापूर (Camphor) देखील प्रभावी आहेत. कोळ्यांना त्यांचा तीव्र वास आवडत नाही. तुम्ही कोळ्यांची शक्यता असलेल्या ठिकाणी कापूर किंवा लवंगा ठेवू शकता. यामुळे कोळी घरात येणार नाहीत आणि जाळ्यांची समस्या कमी होईल.
advertisement
5/7
व्हिनेगर (Vinegar) स्प्रे : घरापासून कोळ्यांना दूर ठेवण्यासाठी व्हिनेगर देखील एक प्रभावी उपाय आहे. एका स्प्रे बाटलीत अर्धा कप पांढरा व्हिनेगर आणि अर्धा कप पाणी मिसळा आणि जाळ्या असलेल्या भागावर फवारा. व्हिनेगरच्या आम्लतेमुळे (Acidity) कोळी तिथे पुन्हा जाळी बांधणार नाहीत.
advertisement
6/7
लिंबू आणि काळी मिरीची पावडर : कोळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडरचा वापर करता येतो. लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि घराच्या कोपऱ्यात फवारा. लिंबाचा वास कोळ्यांना दूर ठेवतो.
advertisement
7/7
काळी मिरी पावडर : एक चमचा मिरी पावडर एका ग्लास पाण्यात मिसळून द्रावण तयार करा आणि भिंतींवर किंवा जाळी असलेल्या भागावर फवारा. त्याचा तीव्र वास कोळ्यांना दूर ठेवतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
वारंवार कोळ्याची जाळी होतेय? फक्त 'या' 2 गोष्टी फवारा, घरातून कायमचा होईल कोळ्यांचा सफाया!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल